Amalner

मोटरसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात..!

मोटरसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात..!

अमळनेर पोलीस स्टेशनला रात्रगस्ती दरम्यान पोहवा/ सुनिल हटकर व पोशि/ राहुल पाटील यांना रात्री ०२:०० वाजेच्या सुमारास एक इसम MH-१९-CA-१३५१ ही दुचाकी अमळनेर शहरातुन धरणगांव कडे घेवून जात असतांना मिळून आला होता त्याचे जवळ गाडीचे कागदपत्र नसल्याने वरील पोलीसांनी त्यास त्याचे नाव, पत्ता, आधारकार्ड व मोबाईल नंबर बाबत चौकशी करुन जाऊ दिले. दुसऱ्या दिवशी सदर मोटर सायकलचा नंबर, इंजिन नंबर/चेचीस नंबर वरुन मोटर सायकल मालकाचा मोबाईल नंबर प्राप्त करुन घेत त्यांना फोन करुन मोटर सायकल बाबत विचारले असता दोन दिवसांपुर्वी सदर मोटर सायकल गोलाणी मार्केट येथुन चोरी झाली आहे असे त्यांनी कळविले.

यावरुन रात्रीचा मुलगा चोरीची मोटर सायकल वापरत असल्याची पोलीसांना खात्री झाली. सदर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली आरोपी नामे खेमचंद तुकाराम पाटील रा. सोनवद खु. ता. धरणगांव यास मोटर सायकल क्र. MH-१९-CA-१३५१ सह ताब्यात घेवून सखोल विचारपुस केली असता त्याने

१) खोटेनगर जळगांव येथून स्प्लेंडर प्लस,
२) प्रताप कॉलेज अमळनेर येथून यामाहा मो.सा.क्र. MH-18-AH-4531
3) खराबवाडी, चाकण पुणे येथून अॅक्टीवा मो.सा.क्र.MH-14-FK-2644
४) खराबवाडी, चाकण पुणे येथून हिरो कंपनीची पॅशन प्रो.
5) लांडगे गल्ली, धरणगांव डॉ. पाटील यांचे दवाखान्या समोरुन हिरो स्प्लेंडर MH-19-BZ-6808
६) गोलीणी मार्केट जळगांव येथून एचएफ डिलक्स MH-19-CA-1351
वरील प्रमाणे मोटर सायकल चोरी केल्याचे कबुल केले आहे.

वरील क्र.०२ मोटर सायकल बाबत अमळनेर पोलीस स्टेशनला गुरनं.६०१/२०२० भादवि ३७९ प्रमाणे, क्र.०३ मोटर सायकल बाबत पुणे येथील चाकण पोलीस स्टेशनला गुरनं.९००/२०२० भादवि ३७९ प्रमाणे, क्र.०५ मोटर सायकल बाबत धरणगाव पोलीस स्टेशनला गुरनं. क्र. ३२४/२०२१ भादवि ३७९ प्रमाणे, क्र.०६ मोटर सायकल बाबत जळगांव शहर पोलीस स्टेशनला गुरनं. २९७/२०२१ भादवि ३७९ प्रमाणे गुन्हे दाखल झाल्याचे निष्पन्न झाले असून आरोपी खेमचंद तुकाराम पाटील यास अमळनेर पो.स्टे.६०१/२०२० भादवि-३७९ या गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

सदर गुन्हयात उप विभागीय पोलीस अधिकारी अमळनेर, श्री. राकेश जाधव साो, व पोनि श्री. जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोह/ सुनिल हटकर पोना/ शरद पाटील, पोना/ प्रमोद पाटील, पोशि/ राहूल पाटील व चापोशि/ सुनिल पाटील या पथकाने कामकाज केले तर तपास सफौ/ बापु साळूखे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button