Delhi

उद्या पासून “ह्या” गोष्टींसाठी मोजावे लागतील जास्त पैसे..!सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री..!

उद्या पासून “ह्या” गोष्टींसाठी मोजावे लागतील जास्त पैसे..!सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री..!

दिल्ली उद्या पासून सर्वसामान्य माणसाच्या खिशाला आता कात्री लागणार आहे.आता उद्या 1 डिसेंबर पासून काही गोष्टींच्या किंमती वाढणार आहेत .परिणामी सर्व सामान्य माणसाच्या खिशावर ताण पडणार आहे. 1 डिसेंबरपासून Jio रिचार्जसह एकूण 4 सेवा महागणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या दर महिन्याच्या खर्चावर होणार आहे. या सर्व ऑनलाईन सेवांच्या किमतीत सुमारे 20 ते 50% वाढ होणार आहे. यामध्ये जिओ रिचार्ज, Amazon प्राइम मेंबरशिप, डीटीएच रिचार्ज आणि एसबीआय क्रेडिट कार्डसारख्या सुविधांचा समावेश आहे.

रिचार्ज प्लॅन

रिलायन्स जिओचे नवीन टॅरिफ प्लॅन 1 डिसेंबर 2021 पासून देशभरात लागू केले जात आहेत. त्यात 20 टक्के वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत JioPhone च्या 75 रुपयांच्या प्लॅनऐवजी 91 रुपये द्यावे लागतील. तर 129 रुपयांचा अनलिमिटेड प्लॅन 155 रुपयांमध्ये मिळेल. Jio ने आपल्या वार्षिक रिचार्ज प्लॅनमध्ये जास्तीत जास्त 480 रुपयांची वाढ केली आहे. जिओच्या 365 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनची किंमत 2399 रुपयांऐवजी 2879 रुपये असेल.

अमेझॉन प्राईम

अमेझॉन प्राइम मेंबरशिप प्लॅनचे नवीन दर 14 डिसेंबरपासून देशभरात लागू होतील. अमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन 50% वाढले आहे, ज्यामुळे वार्षिक सबस्क्रिप्शन प्लॅन 1499 रु असेल जो जो सध्या 999 रु आहे.तीन महिन्यांच्या प्लॅनसाठी 329 रुपयांऐवजी 459 रुपये द्यावे लागतील. तर मासिक प्लॅन 129 रुपयांऐवजी 179 रुपयांचा असेल.अमेझॉन प्राईमच्या सदस्यत्वाच्या वाढलेल्या किमतींचा अमेझॉन प्राईम सदस्यत्व योजनेसाठी ऑटो-नूतनीकरण पर्याय निवडलेल्या ग्राहकांवर होणार नाही.

डिटीएच रिचार्ज

1 डिसेंबरपासून देशातील निवडक वाहिन्यांच्या किंमती वाढणार आहेत. अशा परिस्थितीत युजर्सना हे चॅनेल पाहण्यासाठी 50% जास्त किंमत मोजावी लागेल. स्टार प्लस, कलर्स, सोनी, झी सारखे चॅनेल पाहण्यासाठी ग्राहकांना 35 ते 50% जास्त पैसे द्यावे लागतील. सध्या या वाहिन्यांची सरासरी किंमत 49 रुपये प्रति महिना असून ती दरमहा 69 रुपयांपर्यंत होऊ शकते. सोनी चॅनल पाहण्यासाठी 39 रुपयांऐवजी 71 रुपये प्रति महिना द्यावे लागतील. त्याचप्रमाणे ZEE वाहिनीसाठी 39 रुपयांऐवजी 1 डिसेंबरपासून दरमहा 49 रुपये आकारले जातील. तर Viacom18 चॅनेलसाठी, तुम्हाला 25 रुपयांऐवजी 39 रुपये प्रति महिना द्यावे लागतील.

SBI क्रेडिट कार्ड

SBI च्या क्रेडिट कार्ड युजर्सना मोठा झटका बसणार आहे. 1 डिसेंबरपासून, SBI क्रेडिट कार्डसह खरेदी महाग होईल. प्रत्येक खरेदीवर 99 रुपये आणि कर स्वतंत्रपणे भरावा लागेल. हा प्रोसेसिंग चार्ज असेल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button