Jalgaon

अल्पवयीन मुस्कान शाह आत्महत्याप्रकरणी अत्याचार व पोकसो कलम ४ लावण्याची मागणी- चौकशी अधिकारी राऊत यांना निवेदन

अल्पवयीन मुस्कान शाह आत्महत्याप्रकरणी अत्याचार व पोकसो कलम ४ लावण्याची मागणी- चौकशी अधिकारी राऊत यांना निवेदन

जळगांव प्रतिनिधी नूरखान

१९ जुलै रोजी तांबापुर येथील अल्पवयीन मुलगी मुस्कान शाह ला फूस लावून पळवून नेले व दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह मेहरूण तलावात आढळून आला याप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशन येथे फूस लावून पळविले बद्दल गुन्हा नोंद केला त्या नंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत व पोस्को कलम १२ प्रमाणे विशाल भोई याच्यावर गुन्हा दाखल केला आहे
परंतु आज ८ऑगस्ट पर्यंत पी एम नोट न मिळाल्याने तसेच इतर कागदोपत्री पुरावा आढळून न आल्यामुळे भा द वि ३७६ व पोकसो कलम ४ हे कलम पोलिसांनी अद्याप लावले नाही एवढेच नव्हे तर भा द वि ३०२ प्रमाणेच कारवाई करावी अशी मागणी मुस्कान ची आई सुफिया भिकन शाह यांनी चौकशी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बी एस राऊत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
चौकशी अधिकारी राऊत यांनी फिर्यादी सोबत आलेले सामाजिक कार्यकर्ते मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख ,शिकलगर बिरादरीचे अन्वर खान, शाह बिरादरीचे आसिफ शाह, अनिस शाह तांबापूर येथील समाज सेवक वसीम खान , लतीफ खान अजिज बाबा, मुख्तार शाह यांना समजावून सांगितले की पी एम नोट व इतर अहवाल मध्ये आलेल्या पुराव्यावरून निश्चितच इतर कलम वाढवण्यात येतील.

पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर व चौकशी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत साहेब यांनी सदर प्रकरणी योग्य रीतीने तपास सुरू असून आपल्या निवेदना ची सुद्धा आम्ही योग्य ती दखल घेऊ व मुस्कान शाह ला पूर्ण न्याय मिळवून देऊ असे आश्वासन शिष्ट मंडळास दिले.सदर प्रकरणी आज १९ दिवस झाले तरी जळगाव मधील महिला संघटना इतर संघटनांनी मौन पत्करले आहे एकी कडे सुशांत सिह आत्महत्या प्रकरणी सी आय डी, सी बी आय मागणी साठी सर्व पक्ष ,संघटना व मेडिया लढत आहे परंतु ही अल्पवयीन व झोपडपट्टीत राहणारी मुस्कान साठी कोणीही आवाज काढत नसल्याची खंत फारूक शेख यांनी आपल्या पत्रकात व्यक्त केली आहे
फोटो कॅप्शन
चौकशी अधिकारी सपोनि राऊत यांना निवेदन देताना सुफीया शाह सोबत मयत चे वडील भिकन शाह, मयताचे मामा आसिफ शाह, फारुक शेख,अन्वर खान, अनिस शाह ,आसिफ शाह, मुक्तार शहा वसीम बापू ,अजित बाबा, मुक्तार शहा ,लतीफ खान आदि दिसत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button