Maharashtra

Mollywood.. ही गुणी मराठी अभिनेत्री ह्या कारणामुळे आहे अंथरूणाला खिळून..!पहा वाईट परिस्थिती…

Mollywood.. ही गुणी मराठी अभिनेत्री ह्या कारणामुळे आहे अंथरूणाला खिळून..!पहा वाईट परिस्थिती…

मुंबई काल २८ जुलै २०२१ मराठी सृष्टीतल्या दिग्गज अभिनेत्री मधू कांबीकर ह्यांचा जन्म दिवस ..त्यांचा जन्म जन्म २८ जुलै १९५३ रोजी कांबी या गावी झाला. त्यांचे वडील हे नाटकातील जाणते कलाकार त्यामुळे मधू लहान असल्यापासूनच ते त्यांना आपल्या सोबतच घेऊन जात असत. तेव्हापासूनच त्यांच्या अभिनयाची जडणघडण होत गेली आणि त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. कलाक्षेत्रात अपार मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी अनपेक्षित यश संपादन केले. एवढेच नाही तर लावणीच्या चाहत्यांना लावणीचा इतिहास उमजावा यासाठी त्यांनी लावणी संदर्भातील जेवढे लिखित साहित्य आहे ते जमवून तमाशाचा इतिहास गुंफला.त्यांनी पुण्यातील बाळासाहेब भोसले यांच्याकडून त्यांनी कथ्थकचे प्रशिक्षण घेतले. अस्सल लावणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा हा प्रयत्न यशस्वी ठरला. १९८२ सालच्या शापित चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. इथूनच त्यांच आयुष्य बदलून गेले.

एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू, यशवंत, बिनकामाचा नवरा, येऊ का घरात, मला घेऊन चला, माझा छकुला अशा अनेक चित्रपटातून त्यांनी साकारलेली नायिका, सह नायिका, तर कधी आईची साकारलेली भूमिका प्रेक्षकांना आवडली.पुण्याची मराठी रंगभूमी आणि गोपीनाथ सावरकर प्रतिष्ठान यांनी २७ नोव्हेंबर २०१६ रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरमध्ये आयोजित केलेल्या ‘लावण्य संगीत’ या कार्यक्रमात नृत्य सादर करत असताना मधू कांबीकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले होते तरीही त्यांनी त्या कार्यक्रमात भैरवीचे सादरीकरण केले. त्यानंतर मेकअप रूममध्ये गेल्यानंतर त्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आला त्यात त्यांचा उजवा हात बधीर झाला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल केले होते. याच आजारपणामुळे आज त्या अंथरुणाला खिळून आहेत.
२०१८ साली झी चित्र गौरव पुरस्कारावेळी मधू कांबीकर यांना मराठी चित्रपटसृष्टीतील भरीव योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यावेळी मधू कांबीकर यांची सून शीतल जाधव यांनी त्यांच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला होता. त्यावेळी शीतल जाधव यांनी आपल्याला अशी सासू मिळाली हे माझे भाग्य असल्याचे सांगितले होते. मधू कांबीकर आजारापणामुळे मुलगा प्रीतम आणि सून शीतल यांच्या बोलण्याला कुठलीही प्रतिक्रिया किंवा हालचाल करत नाहीत. मात्र त्यांचे एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू यासारखे चित्रपट आजही लोकप्रिय आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button