Bollywood

Mollywood: सैराटची आर्ची ह्या “परश्या” सोबत डिनर डेट वर…!

Mollywood: सैराटची आर्ची ह्या “परश्या” सोबत डिनर डेट वर…!

मराठी चित्रपट सृष्टीतील सैराट हा सिनेमा सर्वात हिट मराठी सिनेमा. या सिनेमातली जोडी म्हणजे आर्ची आणि परशा अर्थात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे दोन्ही कलाकार ह्या चित्रपटामुळे खूपच प्रसिद्ध झाले. यातील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू ही खूप बदलली असून ती तिच्या हॉट फोटो आणि लूक मुळे नेहमी चर्चेत असते.ती सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे अनेक चाहते आहेत.पण रिंकू आताच तिच्या एका डिनर डेट मुळे चर्चेत आहे.नुकतीच ती तिच्या परश्या सोबत डिनर डेट वर गेली आणि ती एंगेज असल्याचं चाहत्यांना कळलं आहे.तर तिचा परश्या हा खरोखरचा परश्या म्हणजे आकाश ठोसर च आहे. या दोघांचं अफेअर असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत. याचं कारण आहे या दोघांची डिनर डेट. हे दोघेही डिनर डेटला भेटले होते आणि त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत त्यामुळे आर्ची आणि परशा अर्थात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांचं अफेअर सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.रिंकू राजगुरू ही तिच्या वेगवेगळ्या लुकमध्येही तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. रिंकूने नुकताच एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात रिंकू आणि आकाश हे दोघेही डिनर डेटला गेल्याचं दिसतं आहे. खूप खाल्लं यार आता उद्या जास्त कार्डिओ करावा लागणार, असं म्हणत डिनर डेट असं कॅप्शन रिंकूने या फोटोला दिलं आहे. त्यामुळे या दोघांचं म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसरचं अफेअर सुरू आहे अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगताना दिसते .

आकाश ठोसरने सैराटनंतर लस्ट स्टोरीज ही वेब सीरिज, FU यासारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर रिंकू राजगुरूने 100, अनपॉज्ड, 200 हल्ला हो या वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. कागर आणि मेकअप या सिनेमांमध्येही ती झळकली आहे तिच्या कामाचं कौतुकही होतं आहे. अशात आता डिनर डेट या कॅप्शनने रिंकूने फोटो टाकल्याने तिच्या आणि आकाशच्या अफेअरची चर्चा चांगलीच रंगताना दिसते आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button