Maharashtra

Mollywood:हर हर महादेव..! शिवजयंतीच्या पूर्व संध्येला “पावनखिंड” सोबत “बाजीप्रभू” येणार भेटीला….

Mollywood:हर हर महादेव..!शिवजयंतीच्या पूर्व संध्येला पावनखिंड सोबत “बाजीप्रभू” येणार भेटीला….

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘पावनखिंड’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, प्राजक्ता माळी , अंकित मोहन, क्षिती जोग, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी आणि शिवराज वायचळ या कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
दिग्पाल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. त्यांनी पोस्ट शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, उपसून तलवार, कधी झेलून वार, त्या रात्री सहाशे वीर, झाले जीवावर उदार ,इतिहासातल्या अभूतपूर्व लढाईची झलक, सादर आहे ‘पावनखिंड’ चे ट्रेलर! हर हर महादेव

पावनखिंड या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हे दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. तर अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर आणि भाऊसाहेब आरेकर यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. 18 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण इतिहासातील आणखी एक सोनेरी अध्याय मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. सिनेमात छत्रपतींची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकर साकारणार आहे. हा सिनेमा 21 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. पण वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. पण आता ह्या चित्रपट शिवजयंतीच्या पूर्व संध्येला म्हणजे 18 फेब्रुवारी ला प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

पावनखिंड या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. हर हर महादेवच्या जयघोषाने हा ट्रेलर इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button