Bollywood

Mollywood: पावनखिंड मध्ये बाजी प्रभूंची भूमिका साकारणारा बाजी आहे तरी कोण..!जाणून घ्या..!

Mollywood: पावनखिंड मध्ये बाजी प्रभूंची भूमिका साकारणारा बाजी आहे तरी कोण..!जाणून घ्या..!

मृत्यूलाही प्रतीक्षा करायला लावणार्‍या बाजीप्रभूंची झुंज पावनखिंड या चित्रपटामध्ये पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचे इतिहासांच्या पानांमध्ये दडलेले वैभव रूपेरी पडद्यावर पाहायला मिळत आहे. मावळ्यांच्या पवित्र रक्‍ताने पावन झालेल्या घोडखिंडीचा इतिहास पावनखिंड चित्रपटातून सर्वांसमोर आलाय. चला तर मग जाणून घेऊ य़ा चित्रपटात बाजीप्रभूंची भूमिका साकारणारा अभिनेता कोण आहे? त्याचं नाव आहे अजय पुरकर. अजय पुरकर याने बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका हुबेहुब साकारण्यासाठी जीवतोड मेहनत घेतलीय.

तोफे आधी न मरे बाजी, सांगा मृत्यूला! असे म्हणत मृत्यूलाही थांबायला सांगणार्‍या शूरवीर बाजीप्रभू देशपांडेंच्या शौर्याची यशोगाथा या चित्रपटात पाहायला मिळतेय. अभिनेते अजयने बाजीप्रभूंची भूमिका साकारलीय. या चित्रपटासाठी चिन्मय मांडलेकरने पुन्हा शिवरायांचे रूप धारण केले आहे. मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी आदी कलाकारांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत.

कोण आहे अजय पुरकर..?

अजयचं या चित्रपटातील अभिनयाचं खूप कौतुक होतंय. त्याने आणि त्याच्या टीमने जे कष्ट घेतलेत, त्याचे यश या चित्रपटाच्या माध्यमातून दिसत आहे. अजय एक उत्तम अभिनेता आहे. त्याने टीव्हीवर ऐतिहासिक भूमिका साकारली होती. ही त्यांची पहिली ऐतिहासिका भूमिका प्रतापराव गुजर यांची होती. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या ‘राजा शिवछत्रती’मध्ये ही भूमिका होती. काही ठराविक अभिनेत्यांनाचं अशी भूमिका मिळते, हे माझं भाग्य असल्याचं म्हणतो.
अजय यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिलं तर त्यांना व्यायामाची आवड असल्याचे समजते. त्यांच्या इन्स्टावर जिममधील अनेक व्हिडिओ दिसतात. अनेक व्हिडिओ हे कसरत करतानाचे आहेत. बाजीप्रभूंसारखी शरीरयष्टी व्हावी, यासाठी त्याने जिममध्ये घाम गाळला आहे. त्याने व्यायामाचे व्हिडिओ शेअर करताना तशी कॅप्शनही दिलीय.पात्राची भूमिका साकारण्यासाठी अजय यांनी खूप मेहनत घेतली आहे. ट्रेनर यांचं योगदानही आहे. सकाळी ५ वाजता ट्रेनर जिम उघडायचे. पुन्हा पुढे अजय यांना जिममध्ये व्यायाम करवून घ्यायचे.

युद्धाचा प्रसंग

बाजींना वीरगती प्राप्त झाली, त्यासाठी अख्खा एक दिवस शूट करण्यासाठी ठेवलं होतं. कुणी कुणाशी बोलत नव्हतं.

सिंगिग स्टार या छोट्या पडद्यावरही अजय यांनी गाण्यांचे सुंदर सादरीकरण दिलं होतं. सारेगमपा या शोमध्ये त्याने लागा चुनरी में दाग, नमक इश्क का ही गाणी गाऊन त्याने सर्वांना भूरळ घातली. ‘फर्जंद’ चित्रपटामध्ये त्यांनी मोत्याजी मामा ही भूमिका साकारली होती. असंभव या मालिकेत त्यांनी इन्स्पेक्टर वजलवारची भूमिका त्यांनी साकारली होती. या मालिकेतून त्याला खूप लोकप्रियता मिळाली. गुंतता हृदय या मालिकेत तो डिटेक्टिव्हच्या भूमिकेत दिसला होता. तू तिथं मी या मालिकेत मंजिरीच्या काकाची भूमिका त्याने साकारली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button