रावेर

आखाडा विधानसभेचा…. रावेर मतदारसंघात माजी आमदार शिरीष चौधरी यांना काँग्रेस तर्फे उमेदवारी

आखाडा विधानसभेचा….
रावेर मतदारसंघात माजी आमदार शिरीष चौधरी यांना काँग्रेस तर्फे उमेदवारी

आखाडा विधानसभेचा.... रावेर मतदारसंघात माजी आमदार शिरीष चौधरी यांना काँग्रेस तर्फे उमेदवारी

प्रतिनििधी सलीम पिंजारी 

 रावेर मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली असून भाजपाचे उमेदवार अध्या पर्यंत संभ्रमात असून भाजपाचे विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे यांची उमेदवारी निश्चित असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे या मतदारसंघात अपक्ष उमेदवार अनिल चौधरी श्रीराम पाटील एमआयजी विवेक ठाकरे भरत महाजन दीपाली ताई चौधरी यांच्यासह अनेक उमेदवार जरी इच्छुक असले तरीही येथील तीन वेळा आमदार झालेले हरिभाऊ जावळे आणि एक दार खासदार  म्हणून काम केले विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे म्हणून त्यांनी जोरदार तयारी सुरू केलेली असून त्यांचे रावेर मतदारसंघात सलग पंधरा वर्षापासून वर्चस्व राहिलेले आहे त्यांनी अनेक विकास कामे केलेली आहे आणि करीत आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित आहे असे त्यांचे निकटवर्तीयांकडून समजते त्यांनी गेल्या पंधरा वर्षात अनेक योजना या मतदारसंघात आणून अनेक गोरगरीब जनतेला त्याचा लाभ मिळवून दिला आहे म्हणून ते आज भाजपाचे दावेदार आहेत माजी आमदार शिरीष चौधरी यांना काँग्रेसने नुकतीच उमेदवारी जाहीर केली असून काँग्रेस मध्ये सुद्धा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे श्री चौधरी यांच्या गेल्या निवडणुकीत पराभव होऊन सुद्धा त्यांनी गेल्या पाच वर्षापासून त्यांच्या समाजसेवेचा सपाटा सुरू ठेवला आहे वेगवेगळ्या मार्गाने त्यांनी गोरगरीब जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहे आणि गोरगरीब जनतेच्या सुखा दुखात ते सतत सामील होतात तसेच भुसावळचे अनिल चौधरी यांची अपक्ष उमेदवारी घोषित केली असून त्यांना रावेर मतदारसंघात मात्र कसोटी सामना करावा लागणार आहे वरील आजी-माजी आमदार श्री चौधरी आणि हरीभाऊ जावळे यांच्या रावेर मतदारसंघात परंपरगत अनुसार अनेक वर्षापासून ठसा असून त्यांच्यासाठी हे निवडणूक त्रासदायक नसून अनेक – नवीन उमेदवारांना मात्र शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहेत तसेच एम आय एम ची उमेदवारी विवेक ठाकरे यांना मिळाली असून तेसुद्धा या मतदारसंघात नवीन चेहरा म्हणून त्यांना सुद्धा मोठी कसरत करावी लागणार आहे तसेच या मतदारसंघात अनेक उमेदवार जरी इच्छुक असले तरी या मतदारसंघात सध्या आजी-माजी आमदार हरिभाऊ जावळे व शिरीष चौधरी यांच्या अस्तित्वाची लढाई पाहायला मिळणार आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button