Chandwad

चांदवड तालुक्यातील वडबारे येथे आपत्ती व्यवस्थापन चे मॉक ड्रिल

चांदवड तालुक्यातील वडबारे येथे आपत्ती व्यवस्थापन चे मॉक ड्रिल


उदय वायकोळे चांदवड


चांदवड : आज दि 29/7/2021 रोजी सकाळी 11 वाजता नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने वडबारे ता चांदवड येथे मॉकड्रिल घेण्यात आले.या अनुषंगाने तहसील कार्यालयात आपत्ती कक्षास फोन आला व त्यानंतर 15 मिनिटात सर्व यंत्रणा तहसील कार्यालय,पोलीस स्टेशन,नगरपरिषद चांदवड,पंचायत समिती,सार्वजनिक बांधकाम विभाग,म रा वि वि कंपनी,आरोग्य विभाग,शिक्षण विभाग व चांदवड टोल नाका कर्मचारी सर्व साहित्यासह हजर झाले.
तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्ष व प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी आपत्तीच्या अनुषंगाने काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले.टोल फ्री क्रमांक 1077 किंवा चांदवड तहसील कार्यालय आपत्ती व्यवस्थापन कक्ष 02556-252231,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग नाशिक 0253-2317151 या क्रमांकावर संपर्क करण्याचे तहसीलदार श्री प्रदिप पाटील साहेब यांनी प्रेस नोटद्वारे कळविले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button