Pandharpur

सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी महापालिका निवडणुकीत मनसेला विजयी :-मनसे नेते दिलीपबापू धोत्रे (सोलापूर शहरातील शेकडो युवकांचा मनसेत प्रवेश,,मनसेचे प्रभाग निहाय मेळावे सुरू,)

सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी महापालिका निवडणुकीत मनसेला विजयी :-मनसे नेते दिलीपबापू धोत्रे (सोलापूर शहरातील शेकडो युवकांचा मनसेत प्रवेश,,मनसेचे प्रभाग निहाय मेळावे सुरू,)

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : महाराष्ट्र राज्यात येत्या काहि दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होणार आहेत, महानगरपालिका, नगरपालिका निवडणूक होणार आहे, या सर्व निवडणुका मनसे लढवणार असून सर्वांनी जोरात कामाला लागावे असे आवाहन सोलापूरातील बाळे येथे मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी केले,,यावेळी सोलापूर शहरातील शेकडो युवकांनी मनसेत प्रवेश केला,
राज्यभरात मनसेकडून मेळावे आयोजित केले जात आहे,सोलापूर येथील बाळे येथील मंगल कार्यालयात कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता,
सोलापूर शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही, रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे, हद्दवाढ विभागात सोयी सुविधा नाहीत, स्मार्ट सिटीच्या नावाखाली संपूर्ण सोलापूर शहर चिखलमय झाले आहे,
राज्यातील तीन पक्ष्याच्या महाविकास आघाडी सरकारने आणि केंद्रातील भाजपा सरकारने कोरोना काळात जनतेला वाऱ्यावर सोडून दिले, या काळात राज्य आणि केंद्र सरकारकडून सामान्यांना काहीच दिलासा मिळाला नाही, फायनान्स कंपन्या आणि बँकेकडून होणाऱ्या छळवणूक बाबत सरकारने काहीच केले नाही, महावितरणकडून अनेक घरगुती तसेच शेतीचे वीज कनेक्शन तोडण्यात आले त्यावर ही सरकार कडून शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला नाही,केंद्र सरकारने देखील कोणतेही मदत केली नाही ,खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या कोरोनाच्या रुग्णांना लाखो रुपये खर्च करावे लागले याबाबत देखील केंद्र राज्य सरकारने काही केले नाही असे धोत्रे म्हणाले,
त्यामुळे येत्या निवडणुकीत जनता भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, याना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,
कोरोनाच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेला मदत केली, पूरग्रस्तांना मदत केली त्यामुळे जनतेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भरभरून आशीर्वाद मिळेल असा विश्वास धोत्रे यांनी व्यक्त केला जिल्हा उपाध्यक्ष अमोल झाडगे यांनी आयोजन केले होते,
यावेळी जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर,जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख, विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अमर कुलकर्णी,जिल्हा उपाध्यक्ष सत्तार सय्यद, महिला अध्यक्ष जयश्री ताई हिरेमठ,शोभा साठे, अंबिका सावंत, शिवगंगा ताई धवणे,पवन देसाई, डॉ, जाफर नदाफ, शुभम धुमाळ, शिवाजी जाधव,शुभम कोलारकर, आदित्य पाटील, राजाभाऊ जमादार, विपुल कदम, समर्थ ओझा, पवन दोरकर, योगेश खटके, गणेश पाटील, राहुल दम्पल ,कल्पेश बेंबालगी,शैफन जमखंडी, यासीन बांदल, गणेश पवार,निलेश सिदवडकर,अक्षय दोडमनी, ओंकार राजमाने, गौरीश कुंभार ,नागेश गेनेचारी,शहरातील सर्व पदाधिकारी, अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते,,,

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button