Pandharpur

विविध मागण्यांसाठी मनसेचे तहसीलदारांना निवेदन : दिलीप धोत्रे

विविध मागण्यांसाठी मनसेचे तहसीलदारांना निवेदन : दिलीप धोत्रे


रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर टाळेबंदी नंतर नव्याने सर्व काही सुरू होत असताना. नागरिकांची घरपट्टी माफ करणे , फि माफी, आठवडे बाजार सुरू करणे, साखर कारखान्याची बिल अदा करणे अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. या मागण्या पुर्ण न झाल्यास लवकरच आंदोलनाचा इशारा मनसेचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी दिला. मनसेच्या वतीने आज विविध पदाधिकाऱ्यांसोबत तहसीलदार सुशील बेल्हेकर यांची भेट घेऊन सुमारे आठ ते नऊ मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले. या निवेदनामध्ये शहरातील नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करणे , साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची साखर बिले त्वरित अदा करणे अन्यथा कारखान्यांवर गुन्हे दाखल करणे , कोरोना बाधित झालेल्या रुग्णांना रुग्णालयाचा खर्च शासनाने अदा करणे , विद्यार्थ्यांना शिक्षण माफी करणे आणि नवीन वर्गात प्रवेश देणे , पंढरपूर – सोलापूर तिर्‍हे मार्गाच्या रस्त्याचे काम सुरू करणे , 65 एकर परिसरातील रुग्णालयात मोफत उपचार करा , सर्व आठवडे बाजार सुरू करणे , उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत सोयी सुविधा निर्माण करणे . अशा मागण्यांसाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तसेच मनसेच्या वतीने काही उपाय योजना देखील यावेळी शासनाकडे तहसीलदार यांच्यामार्फत सुचवण्यात आले आहेत. प्रसंगी तहसीलदारांनी मनसेचे निवेदन स्वीकारून याबाबत शासनाकडे सकारात्मक दृष्टीने पाठपुरावा करण्याचे आश्वस्त केले असल्याचे धोत्रे यांनी सांगितले. यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल,शाखा अध्यक्ष स्वप्नील जाधव, तेजस गांजाळे,सहकार सेने चे तालुका अध्यक्ष बाळासाहेब चौगुले, शुभम काकडे, नागेश इंगोले, विनोद बागल,अभिमान डुबल इत्यादी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button