Amalner

आमदारांनी फुकट श्रेय घेऊ नये….

आमदारांनी फुकटच श्रेय घेऊ नये…

आमदारांनी लसीकरणाचे श्रेय घेऊ नये.ते काम सरकारी आरोग्य यंत्रणेचे आहे. त्या यंत्रणे वर वचक ठेवून काम करून घेण्याची जबाबदारी आमदाराची आहे.
दवाखाने चालवणे,शाळा चालवणे,एसटी, रेल्वे चालवणे ,पोलीस महसूल चे काम करणे आमदारांची जबाबदारी नाही. तरीही आमदार आपला कामचुकारपणा लपवण्यासाठी या नोकरांच्या कामाचे श्रेय उपटत असतील तर पोरकटपणा आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी़चा फोटो लावण्यास सुप्रिम कोर्टात आक्षेप घेण्यात आला आहे. सुप्रिम कोर्टाच्या ई- मेल वर मोदींचे स्लोगन काढून टाकण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले आहेत.तशी खात्री करून घेतली आहे.

आमदार अनिल पाटील यांनी आरोग्य खात्याचे श्रेय लाटू नये.ते जळगाव जिल्हा नियोजन समीती चे सदस्य आहेत.तर जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर व कॉन्सेन्ट्रेटर खरेदीतील अपहारात लक्ष घालावे. अनिल पाटील यांनी अद्याप याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष का केले आहे? अपहाराशी सहमत असणे, अपहारात सहभागी असणे किंवा अपहार न कळणे यापैकी काहीतरी कारण असेलच. त्याकडे लक्ष द्यावे.
म्हैस व्याली म्हणून मालकाने पौरुषत्व मिरवू नये.ते श्रेय रेड्याचे असते.

जळगाव जिल्ह्यातील एकही आमदार आणि पालकमंत्री सुध्दा सिव्हिल हॉस्पिटलमधील संसाधने खरेदीतील अपहार बाबत बोलत नाहीत. यासाठी गुजरात किंवा मध्यप्रदेश मधील आमदारांनी लक्ष घालावे,अशी अपेक्षा करीत आहात काय?
जळगाव जिल्ह्यात फक्त प्रशासनात भ्रष्टाचार होत नसून आमदार निधीतून जास्त भ्रष्टाचार होत आहे. आणि ही जबाबदारी वैधानिक दृष्टीने आमदारांची आहे.ज्याने विधी प्रस्तावीत केला,तो पुर्ण खर्च होऊन काम पुर्ण करण्याची जबाबदारी त्या त्या आमदाराची आहे.जळगाव जिल्ह्यातील आमदारांनी आतापर्यंत शंभर ठिकाणी कुदळ मारून उद्घाटन केले.पेपरला फोटो टाकून मिरवून घेतले.अद्याप एकही काम पुर्णत्वाचे उद्घाटन केले नाही. आता तरी एखादे काम पुर्ण झाल्याचा एखादा फोटो टाकावा.त्याचा निधी,त्याची गुणवत्ता सांगावी.मी यातून कमीशन घेतले किंवा घेतले नाही ,असे जाहीर करावे.त्याबद्दल आम्ही तुम्हाला श्रेय देऊ.तुम्ही घ्या.

…शिवराम पाटील.
जळगाव जिल्हा जागृत जनमंच.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button