Akkalkot

सकल मराठा समाजाच्या वतीने गनिमी कावा पद्धतीने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना घेराव

सकल मराठा समाजाच्या वतीने गनिमी कावा पद्धतीने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना घेराव

कृष्णा यादव

अक्कलकोट दि.१४ अक्कलकोट येथील सकल मराठा समाजाच्या वतीने गनिमी कावा पद्धतीने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना घेराव घालून आंदोलन करण्यात आले.

सुप्रिम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आल्याने प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज वतीने आकस्मित आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना त्यांच्याच कार्यालयात गनिमी कावा पद्धतीने घेराव घालून आंदोलन करण्यात आले.अचानक झालेल्या आंदोलनाने खळबळ माजली. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला .

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना निवेदन देण्यात आले या याप्रसंगी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश सूर्यवंशी माजी नगराध्यक्ष महेश इंगळे शहर शिवसेनाप्रमुख योगेश पवार फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि मराठा समाज आरक्षणाला पाठिंबा असून सर्व लढायांमध्ये मराठा समाजाच्या अग्रभागी आपण राहू आणि विधानसभेत या प्रश्नावर आवाज उठू अशी ग्वाही दिली यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती स्वामिराव पाटील मध्यवर्ती शिवजयंती उत्सवाचे संस्थापक अमोल राजे भोसले अण्णासाहेब पाटील महामंडळ चे संचालक प्रशांत भगरे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रवीण घाडगे प्रहार संघटनेचे विजय माने मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष योगेश पवार यांच्यासह अमोल सुरवसे भरत राजेगावकर आकाश गडकरी प्रथमेश पवार नितीन शिंदे वैभव घाडगे निंबाळकर आकाश सूर्यवंशी राजेश निंबाळकर कुणाल सूर्यवंशी वैभव मोरे मंगेश फुटाणे कृष्णा माने शीतल फुटाणे अक्षय मोरे शुभम चव्हाण राजा नवले पप्पू काळे ज्ञानेश्वर भोसले गणेश लांडगे आकाश शिंदे महेश निकम संजय गोंडाळ रणजीत गोंडाळ गीत पवार आकाश शिंदे शुभम का मनोरकर यांच्यासह शेकडो मराठा समाजातील युवक उपस्थित होते या आकाश झाल्या गनिमीकावा आंदोलनाने सर्वत्र खळबळ माजली असून आंदोलनासंदर्भात मंगळवार दिनांक 15 रोजी सायंकाळी पाच वाजता सर्जेराव जाधव सभागृह येथे मराठा समाज कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button