Kalwan

कळवण येथे कोरोना पार्श्वभूमीवर प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आमदार नितीन अर्जुन पवार यांनी कोरोना विषाणू निर्मूलन आढावा बैठक घेतली…

कळवण येथे कोरोना पार्श्वभूमीवर प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आमदार नितीन अर्जुन पवार यांनी कोरोना विषाणू निर्मूलन आढावा बैठक घेतली…

विजय कानडे कळवण

कळवण : कळवण सुरगाणा तालुक्यातील ॲंटीजेन व आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण 75 टक्क्यांवर करणे,होमआयसोलेशनपेक्षा संस्थात्मक अलगीकरणावर भर देणे,लसीकरणाच्या मोहिमेला अधिक गती देणे,मास्क, सॅनिटायजर व सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करणे,शासकीय व खासगी रुग्णालयातील बेडचे एककेंद्रीय पद्धतीने नियोजन करणे,ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध व सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे बाबत प्रशासनाला सूचना दिल्या.
यावेळी प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंध लागू करण्याचा विचार करावा लागेल, असं स्पष्ट मत व्यक्त केलं. अधिक कोरोना रुग्ण ठिकाणास हॉटस्पॉट घोषित करताना नगरसेवकांना विश्वासात घेऊन तसेच ग्रामीण भागात सर्वेक्षण करण्यावर भर देण्यास सांगितले. अधिकाऱ्यांनी समन्वयानं काम करावं. नागरिकांपर्यंत पोहोचून कोरोनाबाबत जनजागृती करावी. ऑक्सिजन बेडची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी, असं सूचित केलं. कळवण शहरात काही नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. बाजाराच्या ठिकाणी गर्दी करत आहेत. यावर प्रशासनानं कडक उपाययोजना करुन दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी तसंच अन्यत्र गर्दी होणार नाही; सुरक्षित अंतर राखले जाईल, याची सर्वांनीच दक्षता घेणं आवश्यक आहे. लग्नसमारंभ व अन्य कार्यक्रमासाठी नियमानुसार लोकांची संख्या मर्यादित ठेवणं अपेक्षित आहे, याकडे विशेष लक्ष द्यावे. लसीकरणाचा वेग वाढवावा यासाठी प्रशासनानं खबरदारी घ्यावी, असं सूचित केलं. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी गांभीर्यानं काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सामाजिक अंतर ठेवणं, हात वारंवार धुणं, गर्दी टाळणं या त्रिसुत्रीवर भर देत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करा, असं आवाहन यावेळी आमदार नितीन पवार यांनी केले.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास मीना, तहसीलदार बी.ए.कापसे सुरगाणा तहसीलदार किशोर मराठे,कळवण पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, सुरगाणा सहा.पोलीस निरीक्षक शशीकांत बोडके, अभोणा सहा.पोलीस निरीक्षक श्री.म्हस्के, बा-हे सहा.पोलीस निरीक्षक श्री.लोखंडे कळवण व सुरगाणा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पाटील व डॉ. रणवीर मुख्याधिकारी पटेल, गट विकास अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, पंचायत समिती सभापती सौ.मनीषा पवार,उपसभापती विजय शिरसाठ, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष संदीप वाघ,. सुनिल बापू देवरे आदीसह राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button