Ahamdanagar

हनुमान टाकळी देवस्थानच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही  आमदार मोनिकाताई राजळे

हनुमान टाकळी देवस्थानच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही आमदार मोनिकाताई राजळे

अहमदनगर प्रतिनिधी (सुनिल नजन)

संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्रीक्ष्रेत्र हनुमान टाकळी येथील हनुमान देवस्थानच्या तीर्थक्षेत्र विकास कामासाठी निधी कमी पडुन देणार नाही अशी माहिती शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली त्या समर्थ हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष परम पुज्य रमेश अप्पा महाराज यांच्या ६७ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेन्यात आलेल्या रक्तदान शिबीरात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर आणि समर्थ हनुमान सेवा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीर प्रसंगी बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानि ह.भ.प.हरिश्चंद्र महाराज बर्डे (नाशिक) हे होते.सुरुवातीस अहमदनगर जिल्हा परिषदेच्या लाडजळगाव गटाच्या सदस्या सौ हर्षदाताई काकडे , आ.राजळे,सौ सातपुते मँडम यांच्या हस्ते फीत कापून उदघाटन करण्यात आले. प्रारंभी पाथर्डी तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक आणि हनुमान देवस्थान ट्रस्टचे सचिव सुभाषराव बर्डे यांनी प्रास्ताविक केले.जनकल्याण रक्त पेढीचे डॉ विलास मढीकर आणि डॉ वसंत झेंडे यांच्या पथकाने ४६ पिशव्या रक्त संकलित केले. उपस्थित मांन्यवरांनी परम पुज्य रमेश अप्पा महाराज यांच्या सन्माना बरोबर त्यांनी चाळीस वर्षे केलेल्या कार्याचा लेखाजोखा सादर केला. तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री ,ह.भ.प. भालसिंग महाराज, यांनी आपले विचार व्यक्त केले.याप्रसंगी कुशिनाथ बर्डे, भाउसाहेब उघडे, संभाजी पालवे,अशोक काजळे, शिवनाथ दगडखैर,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे,राष्ट्रीय काँग्रेसचे पाथर्डी तालुका अध्यक्ष प्रकाश शेलार, राजुमामा तागड, महेंद्र सोलाट, सुनिल बर्डे,वैभव खलाटे, संतोष शिंदे,पोपट कराळे,वसंत डमाळ, संतोष जीरेसाळ,विठ्ठल वांढेकर, विजय महाराज, संजय बर्डे, अमोल वाघ,यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक मांन्यवर उपस्थित होते.सुत्रसंचालन सुरेंद्र बर्डे यांनी तर आभार अण्णा दगडखैर यांनी मानले.रमेश अप्पा महाराज यांना विविध मांन्यवरा कडून साडेपाच लाखाची थैली भेट देण्यात आली ती त्यांनी देवस्थानच्या दानपेटीत अर्पण केली. महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली. प्रतिनिधी सुनिल नजन अहमदनगर.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button