Chalisgaon

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते ऋषीपांथा गिरणा व मोती नदी संगमावर काशी पितांबर बाबा यांच्या मंदिरावर होम पूजन कार्यक्रम संपन्न…

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते ऋषीपांथा गिरणा व मोती नदी संगमावर काशी पितांबर बाबा यांच्या मंदिरावर होम पूजन कार्यक्रम संपन्न…

बहाळ येथील भरत येवस्कर व परिवारातर्फे आयोजन…

नितीन माळे

चाळीसगाव – येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र ऋषीपांथा येथील गिरणा व मोतीनदी संगमावर आदिविश्वनाथ तपस्वी दत्तात्रय बाबा आश्रम येथे काशी पितांबर बाबा यांचा दसऱ्याच्या निमित्ताने होम पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते होम पूजन करण्यात आले. बहाळ येथील मूळ रहिवासी व जळगाव येथे रुग्णवाहिका सेवा देणारे भरत येवस्कर व त्यांच्या परिवाराच्या वतीने सदर होम पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुरुवर्य धनंजय महाराज, गुरुवर्य चित्ते बापू, पंचायत समितीचे माजी सभापती दिनेशभाऊ बोरसे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, ग्रा.पं. सदस्य प्रमोद पाटील, अनिल पाटील, सरचिटणीस अमोल चव्हाण, प्रशांत महाले, प्रकाशअण्णा ठाकूर, सागर पाटील व भाविक भक्त उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button