Faijpur

आमदार कपिल पाटील यांची फैजपूर येथे ऐतिहासिक पुण्यभूमीस भेट

आमदार कपिल पाटील यांची फैजपूर येथे ऐतिहासिक पुण्यभूमीस भेट

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

फैजपूर : दिनांक २४ ऑगस्ट रोजी शिक्षक आमदार कपिल पाटील हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी फैजपूर येथील पुण्यभूमी म्हणजे धनाजी नाना महाविद्यालय या ऐतिहासिक ठिकाणी
१९३६ मध्ये झालेल्या आणि काँग्रेस अधिवेशनाच्या काळात साने गुरूजींनी प्रथम राष्ट्र सेवा दलाची मुहूर्तमेढ याच पुण्यभुमिपासून सुरू केली.अशा या पुण्यभूमीस शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी भेट दिली तसेच याच ठिकाणी असणा-या विजयस्तंभाला वंदन करुन ऐतिहासिक स्मृतींना उजाळा दिला.
या परिसरातुन एक प्रकारची प्रेरणा आणि उर्जा मिळत असते विचार तेवत असतात आणि ती प्रचंड उर्जा मला बळ देते अशी भावना त्यांनी आपल्या विचारातून व्यक्त केले.तसेच स्वातंत्र्य संग्रामाची चळवळ फैजपुरसारख्या ग्रामीण भागातून झाली आणि १९३६ मध्ये काँग्रेस अधिवेशन याच ऐतिहासिक भुमितून धनाजी नाना चौधरीनी घडवून आणले त्यांच्या पावन स्मृतीस वंदन करुन ऐतिहासिक स्मृतींना उजाळा दिला. यावेळी शिक्षक भारती माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत देशमुख सर आणि प्राथमिक संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय पवार सर उर्दू माध्यमाचे श्री अय्युब सर तसेच शिक्षक भारतीवर विश्वास असणारे रावेर तालुक्यातील शिक्षक भारतीचे सदस्य तसेच धनाजी नाना महाविद्यालय संस्थेचे सचिव प्रभात चौधरी सर तसेच काॅलेजचे प्राचार्य व स्टाफ उपस्थित उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button