sawada

आमदार निधीतून होणाऱ्या विकास कामांत खोडा देणार्‍या न पा सत्ताधारी व मुख्याधिकारींचे रीकाम्या खुर्चीला शिवसेनेतर्फे बेशरमांच्या फुलांची माळ निवेदन ! ( विकासाच्या दृष्टीने पालिकेच्या दालनात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन करून निषेध निदर्शन )

आमदार निधीतून होणाऱ्या विकास कामांत खोडा देणार्‍या न पा सत्ताधारी व मुख्याधिकारींचे रीकाम्या खुर्चीला शिवसेनेतर्फे बेशरमांच्या फुलांची माळ निवेदन !
( विकासाच्या दृष्टीने पालिकेच्या दालनात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन करून निषेध निदर्शन )

सावदा : येथील शहरातील विकासासाठी नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्या कडून आमदार चंद्रकांत पाटील दिलेल्या दोन कोटी रुपये निधीतून दिलेल्या विकास कामांना नाहरकत देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे विकास कामे रखडली आहे. याचा निषेध म्हणून आज नगरपालिकेच्या दालनात घोषणा देत ठिय्या आंदोलन शिवसेने केले ,नगराध्यक्षा अनिता येवले व मुख्याधिकारी सौरभ जोशी हे पालिकेत नसल्याने त्यांच्या रीकाम्या खुर्चीला शिवसेनेचे निवेदन सादर करून बेशरमांच्या फुलांची माळ घालून, एकच खळबळ उडवून दिली. आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या दोन कोटी रुपये निधीतून येथील शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून, पिण्याच्या पाण्यासाठी नवीन पाण्याची टाकी साठी 75 लाख रुपये मंजूर केले आहेत. शहरात व परिसरातील श्रध्दा स्थान व पर्यटन क्षेत्र असलेल्या खंडेराव वाडी येथील खंडेराव मंदिर देवस्थान येथे सभामंडपासाठी 60 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. तसेच शहरातील नवीन वस्तीतील सोमेश्वर नगर भागात नवीन रस्त्यांसाठी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून, येथील खाँजानगर भागात शादीखाना मुस्लिम कम्युनिटी हॉल साठी 90 लाख रुपये असे किमान दोन कोटींची विकासकामे मंजूर करून आमदारांनी दिली आहेत. मात्र या कामांसाठी नगरपालिकेतर्फे नाहरकत पत्र दिले तर कामे लवकर मार्गी लागतील. वेळोवेळी सांगितले तरी मात्र नगराध्यक्षा व मुख्याधिकारी आमदारांनी दिलेल्या विकास कामांत दिरंगाई करून खोडा घालत आहेत. ते जनतेच्या व विकासाच्या कामास न्याय देत नाहीत. त्यांच्या या प्रवृत्तीला कंटाळून आज शिवसेनेने नगरपालिका गाठली. व पालिका पोर्चमध्ये न पा सत्ताधारी व मुख्याधिकारींचा धिक्कार असो, नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांचे करावे काय खाली डोके वरती पाय अशा घोषणा देत ठिय्या आंदोलन केले. तसेच पालिकेत नगराध्यक्षा व मुख्याधिकारी खुर्च्यांवर नसल्याने त्यांचे रीकाम्या खुर्चीला निषेध व्यक्त करून, बेशरमांच्या फुलांची माळ घालून निवेदन दिलेत. यावेळी पालिकेतील कार्यालयीन अधीक्षक सचिन चोळके यांना शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले.
या वेळी शिवसेना शहरप्रमुख सुरज परदेशी, भारत नेहते,तालुका प्रमुख लाला चौधरी, शहर संघटक निलेश खाचणे, माजी शहरप्रमुख मिलिंद पाटील युवासेना शहरप्रमुख मनिष भंगाळे, गौरव भेरवा, नितीन धोबी,शरद भारंबे, गणेश माळी, गजानन ठोसरे, शेख इरफान, नाजिमखान, गौरव भंगाळे, स्वप्नील महाजन, कृणाल माळी, सागर पाटील, मंगेश माळी, भुषण परदेशी, भगत अशोक पवार, नोमदास भंगाळे, चेतन भंगाळे, वाघराज तायडे, किरण गुरव, चेतन माळी, विशाल तेली, लक्ष्मण पाटील आदी अनेक शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी सपोनि देविदास इंगोले आदि कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button