Pandharpur

पंढरपूर तालुक्यातील कौठळी शिरढोण येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसामुळे नुकसान व पुराच्या पाण्यामुळे शेताची व घराची पाहणी करण्यासाठी आमदार भारत नाना भालके यांची गाव भेट दौरा

पंढरपूर तालुक्यातील कौठळी शिरढोण येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसामुळे नुकसान व पुराच्या पाण्यामुळे शेताची व घराची पाहणी करण्यासाठी आमदार भारत नाना भालके यांची गाव भेट दौरा

प्रतिनिधी रफीक आत्तार

आज आमदार श्री भारत (नाना) भालके साहेबांनी पंढरपूर तालुक्यातील कौठाळी, शिरढोण गावांना भेटी देऊन अतिवृष्टीमुळे व भीमा नदीस आलेल्या पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या शेतीचे,घराचे व इतर वस्तूंचे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी गावातील शेतकर्याशी संवाद साधला.एखाद्यावेळी अतिवृष्टी, दुष्काळ, रोगराई येते तेव्हा पीक जातं, पण ते त्यावर्षीचं पीक जातं.पण यावेळचं जे संकट आहे त्यामुळे जमिनीची जी अवस्था झालेली आहे त्यात त्यावर्षीचंच पीक नाही तर पुढची काही वर्षे पीकच घेता येत नाही. आतिवृष्टीचे हे संकट संपूर्ण शेतीव्यवस्था आणि अर्थव्यवस्था उद्धवस्त करणारे संकट आहे.जमीन खरवडून गेली. त्यामुळे या नुकसानाचे स्वरूप हे नेहमीपेक्षा मोठे आहे. याशिवाय काही ठिकाणच्या शेतकर्याच्या विहिरी होत्या,बर्याच शेतकर्याच्या शेतात असलेल्या घरात पाणी शिरले होते. तर कुणाच्या पाईपलाइन होत्या, कुणी ठिबक सिंचन व्यवस्था केली होती. तर बहुतांश शेतकर्याच्या विद्युत मोटार, स्टार्टर, फ्युज, केबल अन्य काही साधनं होती, तीदेखील वाहून गेलेली आहेत…त्यामुळे अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या पिकांचे घरांचे व इतर वस्तूंचे सरसकट पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या.तसेच काही ठिकाणच्या रस्त्याचे, पुलांचे सुध्दा नुकसान झालेले आहे ते तात्काळ दुरूस्ती बाबतचे प्रस्ताव तयार करण्यास सुचना दिल्या. यावेळी तहसीलदार श्रीमती वाघमारे मॅडम,सहाय्यक गटविकास अधिकारी,तालुका कृषी अधिकारी,महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग,जिल्हा परिषद बांधकामाचे भिमा पाटबंधारे विभाग सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते….

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button