Yawal

विरावली ग्रा प मध्ये राजकीय मोठा भूकंप सरपंच व उपसरपंच असतांना केला पदाचा गैरवापर २००५नंतर सुध्दा तिन आपत्य असुन सदस्य पदावर कायम

विरावली ग्रा प मध्ये राजकीय मोठा भूकंप
सरपंच व उपसरपंच असतांना केला पदाचा गैरवापर
२००५नंतर सुध्दा तिन आपत्य असुन सदस्य पदावर कायम

शब्बीर खान यावल

यावल : विरावली गावात सन 2020-2021 मध्ये निवडून आलेले सरपंच, उपसरपंच , व तीन ग्रा प सदस्य यांच्या विरुद्ध अतिक्रमण , तर उपसरपंच यांचे तीन अपत्य असल्याबाबत तसेच ग्रा.प कारभारात सरपंच यांचे सासरे व उपसरपंच यांचे पती हस्तक्षेप करतात या विषयी तक्रारी अर्ज आज दिनांक 8/10/2021 रोजी शुक्रवारी आज प्रभारी म्हणून यावल येथे गटविकास अधिकारी विलास भाटकर .यांना अ‍ॅड. देवकांत बाजीराव पाटील यावल राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तथा ग्रा प सदस्य विरावली व पवन युवराज पाटील यावल युवक राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष ,विरावली .यांनी पंचायत समिती यावल येथे निवेदन देउन कार्यवाहीची मागणी केली .

तसेच
2020-2021मध्ये निवडून आलेले सरपंच , उपसरपंच ,ग्रा.सदस्य खालील प्रमाणे 1) सरपंच कलीमा फिरोज तडवी यांचे व सासरे , पती ,दीर यांच्या परिवारातील सदस्यांचे राहते घर सरकारी जागेवर अतिक्रमण आहे .उपसरपंच मनीषा विश्वनाथ पाटील यांच्या पती सासरे यांचे राहते घर व दीर यांचे घर व दुकान हे अतिक्रमित जागेत आहे. व त्याच बरोबर उपसरपंच यांना 2001 नंतर तीन अपत्य आहेत .3)ग्रा.प सदस्य तुषार(मुन्ना) सांडू सिंग पाटील यांचे घर सरकारी जागेवर अतिक्रमण असून नमुना नंबर 8 मध्ये घर क्र 78 यात व्हाईटर लावून मूळ क्षेत्र फळात बदल केला आहे. शासकीय दस्तवेज मधून पुरावे नष्ट करणे व ग्रा प दस्तऐवजा मध्ये त्यांनी सरपंच यांच्या मदतीने मूळ दस्ताऐवजामध्ये फेरफार केली आहे. त्यामुळे ग्रा.पं दस्ताऐवजाना धोका निर्माण झाला आहे. 4) ग्रा प सदस्य नथू नामदेव अडकमोल यांचे सरकारी जागेवर घर व दुकानाचे चे अतिक्रमण आहे .5)सदस्य इब्राहीम दलशेर तडवी यांचे व त्यांचे परिवाराचे देखील सरकारी जागेवर अतिक्रमण असून सरपंच यांचे सासरे व उपसरपंच यांचे पती हे नेहमीच ग्रा.प मासिक मीटिंग व इतर ग्रा प कामात हस्तक्षेप करत असतात. तरी वरील सर्व 1 ते 5 राहणार विरवली ता. यावल जि.जळगांव यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अतिक्रमण , 2001 नंतर तीन अपत्य व ग्रा प कामात कामात हस्तक्षेप करणे याची योग्य ती चौकशी करून कायदेशीर कार्यवाही व्हावी व ग्रामपंचायत विरावली सरपंच उपसरपंच व इतर सदस्य यांचे सदस्यत्व रद्द करण्यात अशी मागणी .राष्ट्रवादीचे युवक यावल तालुका अध्यक्ष देवकांन पाटील यांनी केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button