Chalisgaon

मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा टिमतर्फे चाळीसगाव येथील अधिकारी वर्गाला चाळीसगाव ची जलक्राती पुस्तक भेट :नुतन गटविकास अधिकारी यांचे केले स्वागत

मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा टिमतर्फे चाळीसगाव येथील अधिकारी वर्गाला चाळीसगाव ची जलक्राती पुस्तक भेट :नुतन गटविकास अधिकारी यांचे केले स्वागत

चाळीसगाव सोमनाथ माळी

चाळीसगाव तालुक्यातील सोळा गावामध्ये मागील वर्षी मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियानाअंतर्गत एकशे दोन कोटी लिटर जलसाठा निर्माण करण्यात आला या कामाची दखल गव्हर्नन्स या नामवंत मासिकाने घेत चाळीसगाव ची जलक्राती हा सप्टेंबर महिण्याचा विशेषांक संपादक धर्मेंद्र पवार यांनी तयार करून जिल्हाधिकारी जळगाव यांचे हस्ते व मिशन चे प्रमुख उज्ज्वल कुमार चव्हाण सर यांचे उपस्थित प्रकाशन करण्यात आले होते. या अनुसंघाने चाळीसगावचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, तहसीलदार अमोल मोरे,पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड,स्टेशन प्रबंधक बडगुजर,मुख्य स्वास्थ्य निरिक्षक विलास पाटील यांची भेट घेत मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियान अंतर्गत झालेल्या कामांचा आढावा घेणारेअम्रुतवेल गव्हर्नन्स मँगेझिन चाळीसगावची जलक्राती हे पुस्तक भेट देत स्वागत केले. याप्रसंगी पाचपाटील टिमचे प्रा.आर.एम.पाटील, तुषार निकम, सविता राजपूत, शशांक अहिरे,सोमनाथ माळी,धनंजय मांडोळे सहभागी झाले होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button