Amalner

तरवाडे येथील तरुणी बेपत्ता प्रकरणी अपहरणाचा मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

तरवाडे येथील तरुणी बेपत्ता प्रकरणी अपहरणाचा मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

अमळनेर तालुक्यातील तरवाडे येथील रहिवासी विजय सदाशिव पाटील वय 30 वर्षे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार आमच्याकडे माझ्या बहिणीची मुलगी कु.निकीता भिकन पाटील वय 19 वर्षे (जन्म तारीख 22/02/2002) रा.टाहकळी ता.धरणगांव जि.जळगांव असे ही वयाच्या 02 वर्षों पासून आमच्या कडेस शिक्षणासाठी आहे.ती आता BA च्या शेवटच्या वर्षाला धनदाई कलेज अमळनेर येथे शिक्षण घेत होती.मी दि.18/08/2021 रोजी मारवड पोलीस स्टेशनला माझी भाची कु.निकीता भिकन पाटील वय 19 वर्ष ही घरात कोणास काही एक न सागंता रात्रीच्या वेळी कोठेतरी निघुनबगेल्याबाबत मिसींग खबर दिली होती त्यासंदर्भात मिसींग नं.20/2021 अन्वये दाखल करण्यात येवून ऑनलाइन खबरची प्रत मला विनामुल्य
मिळाली आहे.

दि.17/08/2021 रोजी रात्री 09.00 वाजता आम्ही कुटंबातील सर्वे मेंबर
नेहमी प्रमाणे जेवन खावण करुन आप आपल्या जागी झोपलो होतो.भाची कु.निकीता हि घरातच आमच्या आईच्या खाटेजवळ खाट टाकुन
झोपलेली होती. रात्री 11.30 ते 12.00 वाजेच्या सुमारास भाची कु निकीता हि नैर्सगीक विधीसाठी घराबाहेर गेली होती. त्यावेळी आमच्या घरा
जवळ दोन मोटर सायकलीवर तीन मुल आमच्या घरासमोर उभे असल्याचे वडील सदाशिव वामन पाटील यांनी पाहीले होते. त्या मुलांना
वडीलांनी ओळखले असता ते 1.दानिश शेख निसार शेख 2.दिनेश भरत चौधरी 3. भुषण प्रकाश जैन तिन्ही रा.शिरसाळे ता.अमळनेर येथिल
असल्याचे ओळखले होते. परंतू ते ऐवढया रात्री कशामुळे थांबले हे त्यांनी त्यांना विचारले नाही त्यावेळी त्यांनी भाची कु.निकीता हिस हाताने
धरुन मोटार सायकलीवर बसवून शिरसाळे गावाकडे निघून गेले होते.वडील वयोवृध्द असल्यामुळे पाठलाग केला नव्हता. परंतू मोठ मोठयाने
आरडा ओरड केली त्यावेळी पाऊस चालू होता.त्यांच्या आवाजाने कुटुंबातील लोक जागी झालेत त्यावेळी माझा मोठा भाऊ संदीप हे देखील
जागे झाले होते ते त्यांच्या मित्रांसह शिरसाळे गावी जावून भाची कु.निकीता हिस पळवून नेणा-या मुलांकडे तपास केला परंतु ते घरी हजर मिळून
आले नाही. मी देखील झोपेतुन उठलो तेव्हा सकाळी मला झालेला प्रकाराबाबत समजले परंतु माझी पुर्ण खात्री न झाल्याने मी भाची कु.निकीता
हिचा शोध घेवून ती मिळुन न आल्यामुळे वर नमुद तारखेस पोलीस स्टेशनला जावून भाची कु. निकीता हरविल्याबाबत खबर दिली होती.

त्यानंतर वडीलांकडुन व भाऊ संदीप यांच्याकडुन समजले की, भाची कु.निकीता हीस सतिष उर्फ सागर लक्ष्मण कोळी हा उधना येथे
मग्झीमो गाडी क्रमांक MH-18-W-9841 या गाडीने घेवून गेला आहे त्यास लक्ष्मण हिरामण कोळी यानेच नेण्याकामी गाडी करुन दिली
असल्याचे लक्ष्मण हिरामण कोळी यानेच आम्हास सांगीतले तसेच सतिष उर्फ सागर याने कु.निकीता हिस 1)आनंद सोनवणे 2)योगेश पाटील 3)नरेश कोळी पुर्ण नांव माहीत नाही रा.लिंबायत उदना
(गुजरात राज्य) यांच्या ताब्यात दिल्याचे सांगीतले. व म्हणाला तुम्हीजर माझ्या मुलाच्या व त्याच्या मित्रांच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार
दिली तर तुम्हास जिवे ठार मारु असे बोलुन शिवीगाळ केल्याचे समजले. त्यामुळे भाऊ संदीप याने उधना येथे शोध घेणेकामी गेले त्यावेळी
नातेवाईकाकडुन समजले की घरील तिघांना लिबायत पोलीस स्टेशनला जमा केलेले आहे. त्याबाबत भाऊ संदीप याने मला कळविल्यावरुन
माझी आता पुर्ण खात्री झाल्याने मी आज दिनांक 21/08/2021 रोजी फिर्याद देण्यासाठी आलो असुन वरील नमुद 1.दानिश शेख निसार शेख
2.दिनेश भरत चौधरी 3. भुषण प्रकाश जैन तिन्ही रा.शिरसाळे ता.अमळनेर यांनी कु.निकीता हीस फुस लावून पळवून नेण्याकामी लक्ष्मण
हिरामण कोळी यांनी माशीमो गाडी क्रमांक MH-18-W-9841 हि बोलावून पळवून नेण्याकामी सहकार्य केल्याने 1)आनंद सोनवणे 2)योगेश पाटील 3)नरेश कोळी पुर्ण नांव माहीत नाही रा.लिंबायत उदना (गुजरात राज्य) यांच्या ताब्यात घेतल्याने त्यांनी संगनमताने माझी भाची कु.निकीता हिस काहीतरी अमिष दाखवून फुस लावून आमच्या ताब्यातुन पळवून नेवून आम्ही शोध घेत असतांना आम्हास लक्ष्मण हिरामण कोळी याने शिवीगाळ करुन जिवेमारण्याची धमकी दिल्याने वरील लोकांविरुध्द वर प्रमाणे फिर्याद दिली आहे.

संबंधित लेख

Back to top button