Pune

मिस पिंपरी चिंचवड चा किताब जिंकणाऱ्या विशाखाची गळफास घेऊन आत्महत्या…

मिस पिंपरी चिंचवड चा किताब जिंकणाऱ्या विशाखाची गळफास घेऊन आत्महत्या…मिस पिंपरी-चिंचवड स्पर्धेच्या मानकरी ठरलेल्या विशाखा दीपक सोनकांबळे या महिलेने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशाखा यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. विशाखा यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी भागातील मधुबन सोसायटीमधील राहत्या घरात विशाखा सोनकांबळे यांनी सोमवारी सकाळी गळफास घेत आत्महत्या केली. विशाखा सोनकांबळे ह्या योगा प्रशिक्षक देखील होत्या. तसंच त्या मिस पिंपरी – चिंचवड स्पर्धेच्या मानकरी देखील ठरल्या होत्या. त्यामुळे विशाखाने आत्महत्या करण्या सारखा टोकाचं पाऊल उचलल्याने पिंपरी – चिंचवड शहरा मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button