Pandharpur

अल्पभूधारक शेतकरी विहीर अट शिथिल करण्याची आ. समाधान आवताडे यांची मागणी

अल्पभूधारक शेतकरी विहीर अट शिथिल करण्याची आ. समाधान आवताडे यांची मागणी

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना विहीर लाभसाठी लादलेली दोन विहीरमधील ५०० फूट अंतराची अट रद्द करावी या अनुषंगाने पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा आमदार समाधान आवताडे यांनी रोजगार हमी मंत्री संदीपानराव भुमरे व राज्यमंत्री संजय बनसोडे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी पत्रव्यवहार करून सकारात्मक प्रतिसाद मिळवला आहे.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात जलसिंचन सुविधेच्या माध्यमातून हरितक्रांती घडून यावी म्हणून शासनाच्या वतीने सदर योजना सुरु केली होती. सुरवातीला ही योजना जवाहर विहीर योजना या नावाने सुरु होती. परंतु कालांतराने २००५ मध्ये राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या या योजेनेतून विहीर देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला या योजनेतून अल्पभूधारक, मागासवर्गीय, दारिद्र्य रेषेखाली, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी यांना सुरुवातीला या योजनेचा लाभ देण्यात आला. परंतु १७ डिसेंबर २०१७ रोजी दोन विहिरीमधील अंतर ५०० फूट व विहिरीपासून विजेचे कनेक्शन पाच खांबाच्या आत असण्याची अट घालण्यात आली. या अटींमुळे अनेक अल्पभूधारक शेतकरी यांना या योजनेचा लाभ घेता येईना. विहिरीच्या लाभासाठी दीड एकरच्या वरचा लाभार्थी पात्र ठरवला जातो. ज्या शेतकऱ्याकडे दीड एकर जमीन आहे. त्या शेतकऱ्याच्या शेजारी विहीर असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येत नाही.
परंतु दोन विहिरीमधील अंतर ५०० फूट या योजनेमुळे अनेक अल्पभूधारक शेतकरी लाभपासून वंचित राहिले. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना जलसिंचन सुविधेच्या अंतर्गत शेतात पाणी उपलब्धतेसाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ही गरज ओळखत आ. समाधान आवताडे यांनी मंत्री संदीपानराव भुमरे व राज्यमंत्री संजय बनसोडे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी पत्रव्यवहार करीत ही अट रद्द करण्याची विनंती केली. सदर मागणीची मंत्री महोदययांनी दखल घेत लवकरच यावर सकारात्मक तोडगा काढू असे आश्वासन आ. आवताडे यांना दिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button