Nandurbar

राज्य परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनाला एम आई एम चे साथ.

राज्य परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलनाला एम आई एम चे साथ.

नंदुरबार फहिम शेख

दिनांक :- 11-11-21 गुरुवार.

विविध मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रभर राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला नंदुरबार आगारात पोहचून एम आई एमचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सैय्यद रफअत हुसैन व त्यांचे पक्ष सहकार्याने लेखी पाठिंबा जाहीर केला, यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की राज्यभर कर्मचाऱ्यांच्या वतीने सदर आंदोलनाला पाठिंबा मिळणे कामी आमच्या कार्याल्यांना निवेदन सादर केले असून त्याचे संदर्भ घेऊन आमचे प्रदेशाध्यक्ष व औरंगाबाद चे खासदार सैय्यद इम्तियाज जलील साहेबांनी दिनांक :- 08-11-2021 रोजीचे राज्याचे परिवहन मंत्री यांना पत्र पाठवले असुन आज रोजी आम्हीही येथील कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांना आपला लेखी पत्रद्वारे पाठिंबा जाहीर करत आहोत.
यावेळी त्यांचे सोबत मिर्जा मुक्तार बेग, आरिफ हमीद, मुजम्मील हुसैन, हाफिज अबदाल पठाण, मुजाहिद अहमद सुतार, रफीक शेख, नाजीम मन्सूरी, सईद कुरेशी आदी पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कर्मचारी संजय मोरे यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने पक्षाचे आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button