Pandharpur

११कामगारांच्या हस्ते धाराशिव कारखाना युनिट४चे मिल रोलर पूजन संपन्न… (सांगोला कारखाना होणार लवकर सुरू)

११कामगारांच्या हस्ते धाराशिव कारखाना युनिट४चे मिल रोलर पूजन संपन्न…
(सांगोला कारखाना होणार लवकर सुरू)

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : धाराशिव साखर कारखाना युनिट४ सांगोला साखर कारखाना प्रथम गळीत हंगाम सन २०२१-२०२२ चा “मिल रोलर पूजन” धाराशिव साखर कारखाना युनिट४च्या ११ कामगारांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील, मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या उपस्थित पार पडले.
गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला हा कारखाना सुरू होत असल्याने शेतकऱ्यांत, कामगारांत आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. कर्मचाऱ्यांनी रात्र दिवस मेहनत करून कारखाना सुस्थितीत आणला. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने यंदा पावसाचे हि प्रमाण सगळीकडे चांगल्याप्रकारे आहे. या हंगामात लवकर कारखाना सुरू करून भागातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपास आणू. पाऊसकाळ चांगला असल्याने शेतकऱ्यांनी देखील जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे अवाहन धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले.याप्रसंगी धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक संतोष कांबळे, सुरेश सावंत, रणजीत भोसले, जयंत सलगर, दिनेश शिळ्ळे, सुहास शिंदे यासह जेष्ठ संचालक शहाजी नलवडे, तुकाराम जाधव, विश्वंभर चव्हाण, संजय मेटकरी तसेच अधिकारी वर्ग, कर्मचारी, जेष्ठ मंडळी, मित्र परिवार यांच्या उपस्थित पार पडला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button