Amalner

मध्यरात्र खून..!आरोपी फरार आणि पकडण्याचा थरार..!सिंगची खरी सिंगम कामगिरी..हटके हटकर आणि मिलिंदचे अभिनंदन

मध्यरात्र खून..!आरोपी फरार आणि पकडण्याचा थरार..!सिंगची खरी सिंगम कामगिरी..हटके हटकर आणि मिलिंदचे अभिनंदन

अमळनेर येथे दिनांक २७.०८.२०२१ रोजी अमळनेर शहरात हाशीमजी प्रेमजी शॉपींग कॉम्पलेक्स पहिल्या मजल्यावरील कैलास पांडुरंग शिंगाणे (भोई) याचे भोईराज आईसस्क्रीम पार्लर दुकानाबाहेर एक इसम यांचा धारदार शस्त्राने गळा चिरुन खुन केल्याने त्याचे खुनाबाबत माहिती मिळाल्याने लागलीच सपोनि, राकेशसिंह परदेशी हे पोलीस पथकासह घटनास्थळी रवाना होवून घटनास्थळ सुरक्षित करुन घेवून मयताची
ओळख पटविता तो प्रकाश दत्तात्रय चौधरी वय ३२ वर्षे रा. जुना पारधीवाडा, सुभाष चौक अमळनेर असे असल्याचे निष्पन्न झाल्याने मयताचे वडील यांना सदर खुनाबाबत माहिती देवून त्यांना मयताचे प्रेत दाखविता त्यांनी त्यास ओळखले त्यावेळी त्यांना विश्वासात घेवून विचारपूस करता त्यांनी सांगितले कि,
माझा मुलगा प्रकाश दत्तात्रय चौधरी याने एक वर्षापुर्वी टि. व्ही. ची केबल वायर टाकण्याचे घेण्याकरीता कैलास पांडूरंग शिंगाणे (भोई) रा. अमळनेर यास अॅडव्हान्स स्वरुपात एक लाख रुपये दिले होते परंतु कैलास शिंगाणे हा त्यास काम देखील देत नव्हता व पैसे देखील परत करत नव्हता यावरुन त्यांचेत बऱ्याच
वेळा शाब्दीक वाद झालेले होते असे सांगितल्यावरुन दोन वेगवेगळे पोलीस पथक तयार करुन एक पथक अमळनेर शहरातील सी. सी. टि. व्ही. कॅमेरे चेक करणेकामी रवाना केले व दुसरे पथक कैलास शिंगाणे याचा शोध घेणेकामी रवाना करुन मयताचे प्रेत ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे पी. एम. कामी पाठवून मयताचे वडील दत्तात्रय वंजी चौधरी वय ५८ वर्षे धंदा मजुरी रा. जुना पारधीवाडा, अमळनेर यांचे फिर्यादी
वरुन अमळनेर पो.स्टे. भाग ५ गुरनं. ३६१/२०२१ भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर पथकाने अमळनेर शहरात सी.सी.टी.व्ही. कॅमे-याचे फुटेज चेक असता कैलास शिंगाणे हा मयताचे सोबत दिसून आल्याने सदरचा खून कैलास शिंगाणे याने केल्याचे निष्पन्न झाले कैलास शिंगाणे याचे शोध कामी पाठविलेले पथक यांनी त्याचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेवून तो चोपडा येथे गेल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेवून अमळनेर पोलीस स्टेशनला आणुन त्यानंतर आरोपी कैलास पांडुरंग
शिंगाणे (भोई) यांस विश्वासात घेवून विचारपूस करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्हा मा. पोलीस अधिक्षक श्री डॉ. प्रविण मुंढे सो. तसेच मा. उविभागीय पोलिस अधिकारी सो. अमळनेर भाग श्री. राकेश जाधव व पोलीस निरीक्षक जयपाल हिरे सो. यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास सपोनि,
राकेशसिंह सुरेशसिंह परदेशी हे करीत असुन सदर गुन्हयाचे तपासात पोउनि, वाघ सफौ, साळुके, हेकॉ, हटकर, किशोर पाटील, तोमर, विसावे, पोना, भामरे, माळी, पोकॉ, रवि पाटील, अमोल पाटील, राहूल चव्हाण, फॉरेन्सीक टिम जळगांव यांनी सहकार्य केले आहे.

सदर आरोपीस पकडण्यासाठी पो हे कॉ सुनील हटकर व मिलिंद भामरे हे दुचाकीने चोपडा येथे गेले.तेथून आरोपीस शिताफीने दुचाकी वर बसवून अमळनेर येथे आणले हा 35 मिनिटांचा थरारक अनुभव होता असे दोघांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत अजून काहीच तास झाले आहेत. तपास व इतर अनेक गोष्टी अजून प्रकाशात यायच्या आहेत.वाढत्या गुन्हेगारी बद्दल विचारले असता अमळनेर चा वाढीव भाग पाहता इथे लवकरच स्टाफ वाढविण्यात येईल.तसेच नागरिकांना आवाहन केले की अश्या प्रकारच्या सावकारी संदर्भात किंवा पैसे देवाण घेवाण संदर्भात तक्रारदारांनी पुढे यावे पोलीस विभाग आणि निबंधक कार्यालय त्याची योग्य ती दखल घेतील.रॉबरी संदर्भात तपास अत्यन्त महत्वपूर्ण आहे कारण हा आमचा घरचा विषय आहे. जवानास लुटल्यामुळे याची कसून चौकशी केली जात आहे.तसेच उत्कृष्ट कामगिरीबद्दल अमळनेर पोलीस दलातील सपोनि परदेशी,सपोनि गंभीर शिंदे ,सुनील हटकर,मिलींद भामरे,रवी पाटील,दीपक माळी या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button