Bhusawal

भुसावळ ते पुणेदरम्यान पंधरवड्यात दोन वेळा मेमू ट्रेन धावणार

भुसावळ ते पुणेदरम्यान पंधरवड्यात दोन वेळा मेमू ट्रेन धावणार

भुसावळ : भुसावळ रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी 15 व 29 एप्रिल रोजी केवळ दोन दिवस भुसावळ ते पुणे व पुणे ते भुसावळ मेमू ट्रेन चालण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तूर्त पंधरवड्यात चार फेर्‍या मेमू चालवण्यात येणार आहे.
15 व 29 रोजी मेमू धावणार
अप 01135 भुसावळ-पुणे विशेष एक्सप्रेस गुरुवार, 15 रोजी व 29 एप्रिल रोजी भुसावळ स्थानकावरून पहाटे 6.15 वाजता सुटल्यानंतर त्याच दिवशी दुपारी 4.45 वाजता पुण्याला पोहोचणार आहे. या गाडीला अप दिशेला जळगाव, चाळीसगाव, मनमाड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. परतीच्या प्रवासात डाऊन 1136 पुणे-भुसावळ विशेष एक्स्प्रेस शुक्रवार, 16 एप्रिल व 30 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता सुटल्यानंतर त्याच दिवशी रात्री 8.45 भुसावळला पोहोचेल. डाउन दिशेला मनमाड, चाळीसगाव व जळगाव स्थानकावर तसेच उरूली, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापुर, कोपरगांव स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला आठ आरक्षित सिटिंग कोच असतील. 14 पासून या गाडीचे आरक्षण सुरू झाले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button