Nandurbar

आर आर आबा स्वच्छ गाव सुंदर गाव योजनेअंतर्गत तालुकास्तरीय समितीची श्रीरामपुर येथे भेट

आर आर आबा स्वच्छ गाव सुंदर गाव योजनेअंतर्गत तालुकास्तरीय समितीची श्रीरामपुर येथे भेट

फहिम शैख /नंदुरबार

आर आर आबा स्वच्छ गाव सुंदर गाव योजनेअंतर्गत श्रीरामपुर ता. नंदुरबार येथे अक्कलकुवा येथील गट विकास अधिकारी श्री.नंदकिशोर सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने भेट देऊन ग्रामपंचायती अंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकासकामे व उपक्रमांची पाहणी केली.
आर.आर. आबा स्वच्छ गाव सुंदर गाव योजनेअंतर्गत सन २०२०- २०२१ अंतर्गत उकृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीची तालुकांतर्गत समिती मार्फत तपासणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा पंचायत समिती च्या समितीने श्रीरामपूर येथे भेट दिली. यावेळी समितीत ‘ गट विकास अधिकारी श्री.नंदकिशोर सूर्यवंशी , विस्तार अधिकारी वाय.डी.पवार, बी.एफ.निकुंभे, वरीष्ठ सहाय्यक नागरे नाना यांचा समावेश होता. यावेळी समितीने ग्राम पंचायती मार्फत उभारण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या शुद्ध पाणी वॉटर फिल्टर प्लान , तसेच फिनिश सोसायटी या सामाजिक संस्थेमार्फत सुरु करण्यात आलेल्या *जिल्हयातील पहिला प्रयोग सखी प्रेरणा भवन (डिग्निटी रूम) , सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प , जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी उभारण्यात आलेल्या हॅण्ड वॉश स्टेशन आणि मुलींसाठीचे शौचालय तसेच श्रमदानातून केलेल्या वृक्ष लागवड व इतर विकास कामांची पाहणी केली . योवळी सरपंच विमलबाई गांगुर्डे, उपसरपंच शांताराम गावीत, माजी सरपंच शत्रूघन गांगुर्डे , ग्रामसेविका रूपाली देवरे , गट समन्वयक प्रितेश पाटील ‘ ,शकुंतलाबाई गायकवाड, योगिता गायकवाड, किरण ठाकरे , रुस्तम गायकवाड जिल्हा परिषद शिक्षक सोनवणे , गरदरे , कुलकर्णी, अंगणवाडी सेविका, आशाताई, शिपाई, रोजगार सेवक, संगणक ऑपरेटर, फिनिश सोसायटीचे राकेश गुरव तसेच निगराणी सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button