Pandharpur

पत्रकार सुरक्षा समितीची पंढरपूर येथे बैठक – आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार

पत्रकार सुरक्षा समितीची पंढरपूर येथे बैठक – आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार

प्रतिनिधी
रफिक आतार

पंढरपूर पत्रकार सुरक्षा समितीची पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली.या बैठकीत पत्रकार संरक्षण कायदा राज्यातील सर्वच पत्रकारांची नोंदणी पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना यादीवर नसलेल्या वृत्तपत्र ना शासकीय जाहिराती कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसाला आर्थिक मदत राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण इत्यादी विषयावर सखोल चर्चा होऊन आंदोलने तीव्र करण्याचा या बैठकीत निर्धार व्यक्त करण्यात आला.या बैठकीचे आयोजन तालुका अध्यक्ष प्रशांत माळवदे यांनी केले होते.राज्यातील युट्युब व पोर्टल मान्यता साठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे यावेळी एकमताने ठरले आहे. राज्यात कोरोना संक्रमण काळात आपले कुटुंब बाजूला सारून व जीव धोक्यात घालून युट्युब व पोर्टल च्या संपादकांनी व पत्रकारांनी राष्ट्रहित समजून केंद्र सरकार राज्य सरकार तसेच महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आरोग्य यंत्रणा च्या बातम्या जनते पर्यंत पोहोचण्याचे काम करून देखील केंद्र सरकार व राज्य सरकार ने युट्युब व पोर्टल ला अद्याप शासकीय स्तरावर मान्यता दिली नसून मान्यता नसल्याने युट्युब व पोर्टल च्या पत्रकारांना मोठया अडचणी चा सामना करावा लागत असून युट्युब व पोर्टल च्या शासकीय मान्यता साठी पत्रकार सुरक्षा समिती रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलने करणार असे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार म्हणाले राज्यातील युट्युब व पोर्टल च्या मान्यता साठी पत्रकार सुरक्षा समिती अनेक वर्षा पासून केंद्र सरकार व राज्य सरकार कडे पाठपुरावा करत असून आता रस्त्यावर उतरून आंदोलन केल्या शिवाय मान्यता मिळणार नाही त्यासाठी सर्वच पत्रकारांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी केले.या बैठकीला राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना सोलापूर जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे दत्ता पाटील विश्वास पाटील विनोद पोतदार चैतन्य उत्पात रवींद्र शेवडे खिलारे सर भोसले सर सचिन कुलकर्णी कबीर देवकुळे सुरेखा भालेराव -नागटिळक मिस्टर नागटिळक संभाजी वाघुले मोटे दैनिक लोक प्रधान चे पत्रकार रफिक अत्तार हेमंत यादव अशपाक तांबोळी विकास सरवळे प्रकाश इंगोले बाबा काशीद नागनाथ गणपा रवी वीटकर डेव्हीड वेंगुलेकर इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button