Chimur

? स्वातंत्र्यदिन स्पेशल….चिमुर क्रांती भूमीला ऐतिहासीक वारसाची पार्श्वभूमी 1942 ची रक्तरंजित क्रांती आणि प्राचीन वास्तूंनी चिमूर तालुक्याची देशपातळीवर ओळख

? स्वातंत्र्यदिन स्पेशल…

चिमुर क्रांती भूमीला ऐतिहासीक वारसाची पार्श्वभूमी

1942 ची रक्तरंजित क्रांती आणि प्राचीन वास्तूंनी चिमूर तालुक्याची देशपातळीवर ओळख

विशेष लेख….

लेखक — ज्ञानेश्वर जुमनाके

दरवर्षी १५ आॅगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. त्याचबरोबर १६आँगस्ट हा दिवस चिमूर क्रांती दिन म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी चिमूर ने स्वातंत्र्य उपभोगले. ब्रिटीशांना सळो की पळो करुन सोडणारे व १९४२ च्या क्रांती लढ्यात जे शहीद झाले ; आणि ज्या क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यासाठी चिमूरच्या लढ्यात आपल्या प्राणाची आहुती दिली, अशा क्रांतीकारकांना, शहिदांना दरवर्षी चिमूर येथे मानवंदना दिली जाते.

? स्वातंत्र्यदिन स्पेशल....चिमुर क्रांती भूमीला ऐतिहासीक वारसाची पार्श्वभूमी 1942 ची रक्तरंजित क्रांती आणि प्राचीन वास्तूंनी चिमूर तालुक्याची देशपातळीवर ओळख

ज्याप्रमाणे चिमुरची 1942 ची क्रांती इतिहासात अमर आहे, त्याचप्रमाणे चिमूर प्राचिन ऐतिहासिक वास्तूंनी, वारशाने नटलेला आहे. चिमुर तालुका ऐतिहासिक भूमी म्हणून प्रसिद्ध आहे व इतिहासात या वस्तूंची नोंदसुद्धा आहे. चिमूर येथील लोकांचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी देवस्थान हे सुद्धा प्राचीन वारसा आहे. नक्षीकाम व कोरीव कामाचे ज्वलंत उदाहरण आहे. चिमूर तालुक्यातील रामदेगी देवस्थान हे सुद्धा ऐतिहासिक देवस्थान आहे. तेथील कोरीव काम बघून अनेकांच्या भुवया उंचावतात. याच ठिकाणी मोठा धबधबा आहे. हे ठिकाण प्राचीन बौद्ध स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात तर या ठिकाणी जत्रेचे रुप येते. रामदेगी मंदीरात अनेक लोकांच्या धार्मिक भावना जुळल्या आहे.

? स्वातंत्र्यदिन स्पेशल....चिमुर क्रांती भूमीला ऐतिहासीक वारसाची पार्श्वभूमी 1942 ची रक्तरंजित क्रांती आणि प्राचीन वास्तूंनी चिमूर तालुक्याची देशपातळीवर ओळख

चिमुर तालुक्यातील डोमा या गावाजवळ मुक्ताई प्राचीन काळातील देवस्थान आहे. अनेक श्रद्धाळू या ठिकाणी येतात. येथेही छोटा धबधबा आहे. या ठिकाणी अलीकडे संपूर्ण विदर्भातून पर्यटक येतात. त्या ठिकाणी सुद्धा प्राचीन काळातील कोरीव काम व नक्षी कामाचे उत्तम उदाहरण आहे.

? स्वातंत्र्यदिन स्पेशल....चिमुर क्रांती भूमीला ऐतिहासीक वारसाची पार्श्वभूमी 1942 ची रक्तरंजित क्रांती आणि प्राचीन वास्तूंनी चिमूर तालुक्याची देशपातळीवर ओळख

शंकरपुर जवळील मांडवगोटा हे सुद्धा प्राचीन काळातील ठेवा आहे. नेरी येथील पुरातन शंकरजी मंदिर धार्मिक श्रद्धा स्थान म्हणून नावारुपाला आले आहे. भिसी येथील हेमाडपंती शिव मंदीर हे सुद्धा चारशे ते पाचशे वर्ष जुने मंदीर आहे.

? स्वातंत्र्यदिन स्पेशल....चिमुर क्रांती भूमीला ऐतिहासीक वारसाची पार्श्वभूमी 1942 ची रक्तरंजित क्रांती आणि प्राचीन वास्तूंनी चिमूर तालुक्याची देशपातळीवर ओळख

पुरातत्व प्रेमी व इतिहास संशोधकांनी चिमूर तालुक्यातील प्राचीन बावळी विहीरी समोर आणल्या आहेत. या विहीरी पायऱ्याच्या असून शिल्प काम व कोरीव कामाची छाप आहे. कोलारा तु, तिरखुरा रोड, गडपिपरी, पिंपळनेरी या ठिकाणी पायऱ्याच्या बावळी विहीरी मिळाल्याने चिमूर क्रांती भूमीचा ऐतिहासिक वारसा ठळकपणे पुढे आला आहे व नविन इतिहासात भर पडली आहे.

? स्वातंत्र्यदिन स्पेशल....चिमुर क्रांती भूमीला ऐतिहासीक वारसाची पार्श्वभूमी 1942 ची रक्तरंजित क्रांती आणि प्राचीन वास्तूंनी चिमूर तालुक्याची देशपातळीवर ओळखचिमुर तालुक्यातील महादवाडी येथे एेतिहासिक मंदीर आहे. त्या वारशाची डागडुजी पुरातन विभागाकडून करण्यात येत आहे.

चिमुर तालुका ऐतिहासिक भूमी म्हणून नावारुपास येत आहे. या सर्व वारस्याचे रक्षण होणे गरजेचे आहे. काळाच्या ओघात अनेक ठिकाणचा प्राचीन वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वानी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button