Chimur

विवाहित महिलेने गळफास लावून केली आत्महत्या

विवाहित महिलेने गळफास लावून केली आत्महत्या ….चिमूर येथील घटना

चिमूर प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके

चिमूर येथील गुरुदेव वार्ड मधील गंगासागर कालिदास गायकवाड वय 22 वर्ष या विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केली .
चिमूर वन विभाग कार्यालयात कालिदास गायकवाड कार्यरत असून गुरुदेव वार्ड येथील देवतळे यांचे घरी किरायाने राहत होते . त्यांच्या सोबत शिक्षण घेण्यासाठी मयतची बहीण सुद्धा राहत होती.

पती हे ड्युटीवर तर बहीण ट्युशन ला गेल्यावर ती एकटीच घरी असल्याने तिने पंख्यास ओढणी लावून स्वतः ला गळफास लावून आत्महत्या केली .
कालिदास गायकवाड हे आपल्या घरी आल्यावर दार मागून बंद असल्याने दार ठोठावला पण दार उघडले नसल्याने काचेच्या खिडकीतून बघितले असता गळफास लावल्याचा प्रकार दिसल्याने रडारड सुरू झाली पोलीस स्टेशन ला माहिती दिली असता पोलिसांनी दारास जोरदार धक्का देऊन दार उघडण्यात आले .

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती इंगवले पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांनी प्रत्यक्ष राहून त्यांचे मार्गदर्शनात
घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button