Amalner

Amalner: मातृशक्ती जिजाऊ- आदर्श माता व स्वामी विवेकानंद जयंती ग्राहक पंचायत तर्फे साजरी…

मातृशक्ती जिजाऊ- आदर्श माता व
स्वामी विवेकानंद यांचे विचार जे आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतील

आज स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाबाई यांच्या जयंती निमित्ताने अखिल भारतीय ग्राहक पंचायत
अमळनेर येथे कोविडं चे निर्बंध पाळून छोटेखानी जयंती उत्सव साजरा केला. अध्यक्ष ऍड.सौ. भारती अग्रवाल यांनी प्रतिमेला हार अर्पण केला. सचिव सौ. कपिला मुठे यांनी संगठण मंत्राने कार्यक्रमास सुरवात केली.कपिला मुठे यांनी स्वामी विवेकानंद यांचे आत्मविश्वास वाढविणारे प्रेरणादायी विचार सांगितले. युवकांचे प्रेरक स्थान असे स्वामी विवेकानंद म्हणून आजचा दिवस युवा दिन म्हणून साजरा करतो युवांचेच नाही तर संपूर्ण मानवजातीचे एक मार्गदर्शक ज्यांनी जीवन कसे जगावे हे त्यांच्या विचारांच्या माध्यमातून समजावून सांगितले, .भारती अग्रवाल यांनी त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी घटनांवर उजाळा दिला तसेच जिजाबाई यांच्या शौर्य गाथा सांगितल्या तसेच श्री. विजय शुक्ल यांनी शिकागो मध्ये बंधू आणि भगिनी बोलून सर्वांच्या मनाला जिंकणारे, आपल्या राष्ट्राची ओळख सर्वदूर पसरविणारे ज्यांच्या विचारांना वाचून शरीरात नव्या ऊर्जेचे उत्पन्न होण्याचे स्त्रोत आहे असे सांगितले. प्रसंगी उपाध्यक्ष सौ. स्मिता चंद्रात्रे कोषाध्यक्ष सौ. वनश्री अमृकर सहकोषाध्यक्ष,सौ.अंजू ढवळे सदस्य विमलताई मैराळे उपस्थित होत्या. आभार प्रदर्शन सौ. स्मिता चंद्रात्रे यांनी केलं.विसर्जन मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button