India

स्त्रियांचे हस्त मैथुन..! वाद का..? जाणून घ्या फायदे..!

स्त्रियांचे हस्त मैथुन..! वाद का..?

लैंगिक इच्छा हा अत्यन्त खाजगी पण महत्वपूर्ण विषय..!पण भारतात मात्र ह्या विषयावर अ बोलणे लिहणे,चर्चा करणे हे निषिद्ध आहे. नैसर्गिक असलेली ही क्रिया करताना देखील चोरून लपून अंधारात सर्वांच्या अपरोक्ष न बोलता केली जाते.वास्तविक ज्या पद्धतीने इतर नैसर्गिक गोष्टी आहेत जसे शी..सु..केस वाढणे गळणे,भूक लागणे,जेवण करणे इ तशीच लैंगिक इच्छा देखील नैसर्गिक आहे.पण भारतात मात्र ह्या विषयाकडे एकदम वेगळ्या आणि विचित्र दृष्टिकोनातून पाहिले जाते. विशेष म्हणजे करतात सर्वच … पण उघड पणे बोलत नाही किंवा करत नाही.. असो आज ह्याच विषयाला अनुसरून हस्त मैथुन ह्या बाबतीत बोलू यात..त्यातल्या त्यात महिलांचे हस्त मैथुन..! दचकलात..!होय महिलांचे हस्त मैथुन..!जाणून घेऊ का आवश्यक आणि फायदेशीर आहे..

तस पाहिलं तर स्वतःची लैंगिक इच्छा स्वतःच शमवायची उर्मी अतिशय नैसर्गिक आहे. माणसं, माकडं हस्तमैथुन करतात. कुत्रे आणि ब्लू व्हेलही स्वमैथुन करतात.

जेंव्हा पुरुषांच्या हस्तमैथुनबद्दल बोलतो तेंव्हा हा प्रश्न उपस्थितच होत नाही कारण पुरुषांनी त्यांची अती लैंगिक इच्छा शमविण्यासाठी ते केलं तर चालतं तेंव्हा ती अगदीच सामान्य गोष्ट असून इथपासून ते थेट यामुळेच स्त्रियांवरचे लैंगिक अत्याचार कमी होतात असेही समर्थन आले आणि निष्कर्षांची चर्चाही झाली.

महिलांचे हस्त मैथुन वाद का..?

भारतात महिलांचा दुय्यम दर्जा ,सामाजिक आणि आर्थिक कमकुवता एकंदरीत भारतीय स्त्रियांसंदर्भात असलेले रीती रिवाज,व्यवस्था यामुळे भारतीय महिला आजही वेगवेगळ्या अनुषंगाने सुरक्षित नाहीत हे अनेक प्रकारच्या सर्व्हेक्षणातून सिद्ध झाले आहे. तस तर संपूर्ण जगात महिलेकडे फक्त भोग वस्तू म्हणून च आजही पाहिले जाते.

जेंव्हा एखादी स्त्री नवऱ्याला गृहीत न धरता आणि न विचारता आपल्या लैंगिक इच्छा स्वत:च पूर्ण करत आहे. सेक्स म्हणजे बाईचं समर्पण, तिने द्यायचं आणि पुरुषांने घ्यायचं, अशा कल्पनांना ती बळी पडत नाही. ती तिच्या नवऱ्याकडून खूश नाही आणि तिने तिचा मार्ग शोधला आहे.ही गोष्ट तथाकथित समाज व्यवस्थेला,पुरुषांना आणि पुरुष प्रधान संस्कृती ला पचत नाही, आवडत नाही आणि सहन देखील होत नाही.

पण ज्या बायका आपल्या लैंगिक समाधानासाठी झगडतात, कदाचित संपूर्ण समाधानी नसतात, हस्तमैथुनाबद्दल बोलायला घाबरतात आणि केलंच कधी तर प्रचंड गिल्ट घेऊन जगतात त्यांचं काय?
मुळात बायका हस्तमैथुन करतात का? अर्थातच हो! पण खूप कमी प्रमाणात.. आणि त्यांचा हा प्रवास पुरुषांइतका सोपा नसतो. कोणत्याही पुरुषाला विचारा तू शेवटचं हस्तमैथुन कधी केलं होतं, त्याचं उत्तर असेल, आज सकाळी, काल, परवा, एका आठवडयापूर्वी, जास्तीत जास्त महिन्यापूर्वी.

बाईला हाच प्रश्न विचार तर? उत्तर मिळणारच नाही.

कारण आपल्या लैंगिक इच्छा आकांक्षांविषयी एखादी स्त्री आपल्या नवऱ्याशीही खुलेपणाने बोलू शकत नसेल तर या विषयावर चारचौघात काय बोलणार. पण आकडेवारी बघितली तर लक्षात येतं की, हस्तमैथुन करणाऱ्या बायकांची संख्या कमी नाही.

जगभरात जवळपास 62 टक्के स्त्रिया हस्तमैथुन करतात असा सर्वे आहे.

एका डॉ शी चर्चा केली असता त्यांनी याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. त्यांच्या मते अर्थात भारतात अशी आकडेवारी उपलब्ध होणं कठीण आहे कारण भारतीय स्त्रियांना आपण हस्तमैथुन करतो हे सांगण्यात संकोच किंवा अपराधी वाटतं.

महिलांनी हस्तमैथुन करण्याचे फायदेही त्या विषद करतात. हस्तमैथुनामुळे वाईट काही होत नाही. उलट शरीरात मुड चांगला करणारी संप्रेरक स्रवतात. या संप्रेरकांमुळे तणाव कमी होतो आणि मासिक पाळीत होणारा त्रासही कमी होऊ शकतो. तुम्हाला लैंगिक आजार होत नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे यात गरोदरपणाचा धोका नसतो.

हस्तमैथुनामुळे restless leg syndrome (मज्जासंस्थेचा एक आजार ज्यामुळे सतत पाय हलवण्याची इच्छा होते आणि बैचेन व्हायला होतं) बरा होण्यासही मदत होते.

सतत तणावाखाली वावरणाऱ्या भारतीय महिलांना हस्तमैथुनामुळे हलकं वाटू शकतं अस त्या पुढे सांगतात.

स्त्रिया हस्तमैथुन का करतात?

हस्तमैथुन हा आनंददायी अनुभव आहे. माझ्या शरीरावर आणि लैंगिक आनंदावर माझं नियंत्रण आहे आणि दुसरं कोणी माझ्यावर वर्चस्व गाजवू शकत नाही ही भावना हस्तमैथुनामुळे मिळते.

आपल्याला काय हवंय, कशात आनंद मिळतो, सुखाचा उच्चतम बिंदू काय केलं की गाठता येतो, अशा सगळ्या गोष्टी बाईला हळूहळू कळू लागतात. हा तिच्यासाठी मुक्त करणारा अनुभव असतो.

स्त्रियांनाही लैंगिक इच्छा-आकांक्षा असतात हे आपल्या समाजात मान्यच नाही.याच्या इतकं दुर्दैव नाही दुसरं काही. आपण 21 व्या शतकात आहोत आणि याबद्दलचा अवेअरनेस आपल्याकडे नाही आहे. बाई आपल्या इच्छा स्वतःच पूर्ण करू शकते हे पचनी पडत नाही.बाईला सेक्सविषयी काही माहीत असावं, त्याविषयी तिने स्वतः काही प्रयोग करावे, नवऱ्याकडे किंवा प्रियकराकडे आपल्याला हव्या तशा सुखाची मागणी करावी हे चालतच नाही आपल्या लोकांना. आणि त्यातूनही एखादीने असा प्रयत्न केला तर ते तिच्या नैतिकतेशी जोडलं जातं.

हिला हे सगळं माहीत आहे म्हणजे ही काहीतरी भयंकर आहे असाच शिक्का मारतात लोक. तिने ते सगळं येता-जाता अनुभवलय, आणि she is a bad girl असं सर्रास ठरवून मोकळे होतात लोक ..!

स्त्रियांमध्ये हस्तमैथुन अगदी कॉमन आहे. प्रत्येक महिलेने हस्तमैथुन कधी ना कधी ट्राय केलं आहे. पण त्याकडे बघायची समाजाची दृष्टी स्वच्छ नसल्याने त्यांना प्रचंड अपराधी वाटतं.पण मला समजत नाही यात अपराधी वाटण्यासारखं काय आहे? तुमचं डोकं दुखायला लागलं की तुम्ही डोकं चेपता ना? तितकंच हे नैसर्गिक आहे हे. तुम्हाला होणाऱ्या सेन्सेशन्स त्या त्या वेळी पूर्ण करणं या गैर काहीच नाही.

पण समाजाने मात्र या नैसर्गिक गोष्टीचा अधिकार स्त्रियांना नाकारला आहे. आपल्या भाषेत हस्तमैथुनाच्या क्रियेला स्त्रियांच्या अनुषगांने शब्दच नाहीत. जे आहेत ते पुरुषांनी क्रिया करण्यावर आहेत. म्हणजे आपल्या कडे एक कन्सेप्ट म्हणूनही स्त्रियांचं हस्तमैथुन मान्य नाही.मी नुकताच स्वरा भास्कर अभिनित विरे दि वेडिंग हा चित्रपट पाहिला आणि यातील स्वराची भूमिका उत्कृष्ट आहे.पण यातील काही प्रसंग पुरुष प्रधान संस्कृती ला अमान्य आहेत.हा चित्रपट पाहिला आणि स्त्रियांचे हस्त मैथुन हा विषय डोक्यात आला.ह्या चित्रपटाचे रिव्ह्यू पाहिले..स्वरावरील टिका वाचल्या आणि ह्या विषयावर लिहिण्याचं ठरविलं…

मित्र मैत्रीणींनो आपण सर्वच बदलतो आहोत..सर्व बदल आपण वेगाने स्वीकारले आहेत पण अजून ही आपण महिलांच्या संदर्भातील काही बदल स्वीकारू शकत नाही. हस्त मैथुन काही वाईट नाही..पर पुरुषाकडे तर ती जात नाही मग काय प्रॉब्लेम आहे..? स्त्रियांच्या मनातला अपराधीभाव आणि संकोच घालवण्यासाठी यावर खुलेपणाने चर्चा करणे. जेव्हा स्त्रिया यावर खुलेपणाने बोलून आपले अनुभव मांडायला लागतील, तेव्हाच समाजातून या गोष्टीला होणारा विरोध कमी कमी होत जाईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button