Pandharpur

मदत नव्हे तर कर्तव्य! श्रीकांत चव्हाण सर यांच्याकडून मास्क आणि सॅनिटायजर पोलीस प्रशासनाला सुपूर्द.

मदत नव्हे तर कर्तव्य! श्रीकांत चव्हाण सर यांच्याकडून मास्क आणि सॅनिटायजर पोलीस प्रशासनाला सुपूर्द.
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : सध्या राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे.परंतू नुकतीच झालेली पंढरपुर मंगळवेढ्यातील निवडणूक आणि नेत्यांच्या हलगर्जीपणामुळे पंढरपुर मध्ये सध्या भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.हजारो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, शेकडो लोकांनी जीव गमावला आहे आणि अजूनही पंढरपूरातील परिस्थिती आटोक्यात आलेली नाही.इथली आरोग्य व्यवस्था पुर्णपणे हतबल झाली असल्यामुळे सध्या स्थानिक नेते व सामाजिक कार्यकर्ते आपापल्या परीने मदत करण्यासाठी धडपडत आहेत.या वाईट काळात जिवाची पर्वा न करता झोकून देऊन काम करणारे पोलिस प्रशासन यांच्या सुरक्षिततेसाठी आज सुस्ते येथील नामवंत शिक्षक व समाजसेवक श्रीकांत चव्हाण सर यांनी पंढरपुर तालुका ग्रामीण पोलीस निरीक्षक किरण अवचर साहेब यांची भेट घेऊन मास्क व सॅनिटायझर भेट दिले.मी या परिस्थितीत हातावर हात धरून बसण्यापेक्षा,फुल ना फुलाची पाकळी म्हणून जमेल तेवढं कर्तव्य पार पाडण्याचा निर्धार केला आहे असे श्रीकांत चव्हाण सर यांनी सांगितले.त्याचबरोबर पंढरपुर शहर व तालुक्यातील सर्व तरूण सहकारी मित्रांनी सुद्धा प्रशासनाला आणि लोकांना शक्य तितके सहकार्य आणि मदत करण्याचे आवाहन सुद्धा केले आहे.यावेळी सुस्ते चे पोलिस पाटील परमेश्वर कांबळे पो.गजानन माळी व पोलिस शिप
कर्मचारी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button