Amalner

?️अमळनेर कट्टा…मारवाड पोलिसांची अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कार्यवाही..मुद्देमाल जप्त..गुन्हा दाखल…

?️अमळनेर कट्टा…मारवाड पोलिसांची अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कार्यवाही..मुद्देमाल जप्त..गुन्हा दाखल

अमळनेर तालुक्यातील धार येथील बोरी नदीतून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एकाविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली असून टेम्पो आणि ६००
रुपयांची वाळू जप्त करण्यात आली आहे. तालुक्यात वाळू माफियांना उत आला असून अमळनेर तालुक्याच्या चारही बाजूंनी जोरदार वाळू उत्खनन सुरू आहे. प्रशासनाच्या कार्यवाहीना न जुमानता वाळू माफिया सातत्याने वाळू उपसा करत आहेत. छोटे मासे पकडण्यात जरी प्रशासन यशस्वी होत असले तरी मोठ्या मास्यांना हात लावण्याची हिम्मत प्रशासनाची नाही.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील धार येथे १३ रोजी पहाटे बोरी नदीतील वाळू टेम्पोमधून अवैधरित्या वाहतूक करत असलेल्या
सागर छोटू पाटील रा. रंजाणे ला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. रात्र पाळीची गस्त करणारे हे कॉ कैलास सोनार,संजय पाटील, होमगार्ड सुरेश पवार, सीताराम वडर यांना सदर टेंपो आढळून आला.या कार्यवाहीत १२ हजार रु किंमतीचा टेम्पो , ६०० रुपयांची वाळू जप्त करून मारवाड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.ठाणे अंमलदार भास्कर चव्हाण यांनी सागर विरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button