Amalner

मारवड पोलिसांनी उद्धवस्त केली हातभट्टी…

मारवड पोलिसांनी उद्धवस्त केली हातभट्टी…

अमळनेर निंभोरा येथे मारवड पोलिसांनी छाप टाकून गावठी दारू तयार करण्याची भट्टी उद्धवस्त केली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी ७ हजार ६०० रुपयांचे दारू तयार करण्याचे इतर जप्त केले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील निंभोरा येथे शेताजवळील नाल्यात छापा मारला असता ज्ञानेश्वर सुकलाल कोळी हा गावठी हात भट्टीची दारू तयार करीत असताना आढळून आला. पोलिसांना पाहून त्याने तेथून पळ काढला. या वेळी पोलिसांनी ७ हजार ६०० रुपयांचे दारू बनवण्याचे साहित जप्त केले. याप्रकरणी पोहेका सुनील आगोने यांनी मारवड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button