Amalner

जिजाऊ बहुउद्देशिय संस्था व फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुप तर्फे “हुतात्मा दिन साजरा”

जिजाऊ बहुउद्देशिय संस्था व फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुप तर्फे “हुतात्मा दिन साजरा”

अमळनेर : जिजाऊ बहुउद्देशिय संस्था व फिनिक्स सोशल अवेरनेस ग्रुपच्या अध्यक्षा ॲड.ललिता पाटील
यांच्या मार्गदर्शनाने दि ९ ऑगस्ट रोजी हुतात्मा दिन साजरा करण्यात आला.
९ ऑगस्ट हुतात्मा दिनानिमित्त अमळनेर शहरातील व तालुक्यातील भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी ज्या ज्या शहीद हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले . त्यांच्या स्मरणार्थ अमळनेर शहरात विविध ठिकाणी पुतळे व स्मारके उभारण्यात आली आहेत , त्यात तहसील कार्यालय आवर,अर्बन बँक समोरील साने गुरुजीचा पुतळा,नगरपालिके जवळील वीर बिरसा मुंडा स्मारक ,सुभाष चौकातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा, राणी लक्ष्मीबाई चौकातील लालबवटा हुतात्मा स्मारक ,गांधलीपुरा भागातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा,पैलाड भागातील हुतात्मा स्मारक या सर्व पुतळे व स्मारकांची स्वच्छता करून पुष्पचक्र व माल्यार्पण करून त्यांच्या कार्याला नमन व वंदन करण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी ॲड.ललिता पाटील ,प्रा प्रकाश महाजन,वसुंधरा लांडगे,कोमल बाफना,भरती कोळी,प्रतिभा मराठे, नायब तहसीलदार पवार साहेब, गुप्तवार्ता शाखेचे चिंचोरे साहेब,जितेंद्र साळुंके व मान्यवर नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button