Chopda

आॕर्किड इंटरनॕशनल स्कूलमध्ये ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा..

आॕर्किड इंटरनॕशनल स्कूलमध्ये ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा..

चोपडा : चोपडा येथील यशोधन चॕरिटेबल ट्रस्ट संचलीत आॕर्किड इंटरनॕशनल स्कूल मध्ये ८ मार्च जागतिक महिला दिवस आॕनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. संस्थेच्या सदस्या डाॕ. तृप्ती पाटील यांच्या हस्ते शारदा देवीच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमास ज्यु.के.जी, सिनि.के.जी. व इ.१ ली ते ४ थीचे विद्यार्थी व पालक माता,भगीनी सहभागी झाले होते. शिक्षिका विजया लांडगे यांनी प्रास्तविक केले तसेच महिला दिनाबद्दल माहिती सांगितली. अध्यक्षिय भाषणातुन डाॕ.तृप्ती पाटिल यांनी जागतिक महिला दिन म्हणजे महिला सशक्तिकरण दिवस. स्त्री ही अनादी काळापासून शक्ती स्वरुपात आहे.महिला सशक्तिकरण हे आधुनिक नसून पौराणिकच आहे.बदलत्या परिस्थितीत मात्र स्त्रीची भुमिका बदलली आहे.ती मुलगी,सून,पत्नी ,माता ह्या भुमिकाव्यतिरिक्त अधिकारी ,वैज्ञानिक ,शिक्षक ,कर्मचारी अशा अनेक रुपांनी आहे.तिच्या जीवनाला अनेक पैलू लाभले आहेत आणि तिने आपल्या कर्तृत्वाने त्यांना अधिक चमक दिली आहे.स्त्री ही आज कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या पुढे आहे असे महिला दिनाचे महात्म्य सांगितले . तसेच सध्याच्या करोनाच्या भीषण परिस्थितीत खास विद्यार्थ्यींनींना घरी राहा,सुरक्षित राहा,खूप अभ्यास करा व आदर्श व्यक्तिमत्त्व होण्याच्या व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी श्री.नितेश वाघ यांनी आभार मांडले . संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.उमेश महाजन, समन्वयक,शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button