Aurangabad

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री भेटीतून मराठा समाजाला काहीही मिळालं नाही : विनोद पाटील..

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री भेटीतून मराठा समाजाला काहीही मिळालं नाही : विनोद पाटील..

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : पंतप्रधान आणि मुख्यमंत्री भेटीतून मराठा समाजाला काहीही मिळालं नसल्याची खंत मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केली.

विनोद पाटील म्हणाले

कालपासून राज्यात चित्र रंगवलं गेलं की भेट फक्त मराठा आरक्षणासाठी आहे, मात्र अस काही घडलं नाही. आम्हाला फक्त आशा दाखवण्यात आली. आम्हाला वाटलं आज जबाबदारी निश्चित होईल, केंद्र किंवा राज्य सरकारबाबत, मात्र असं काहीच झालं नाही. साधं आश्वासन सुद्धा मिळालं नाही, हे दुर्दैवी आहे.

आरक्षण मुद्दा अनेक मुद्द्यांपैकी एक मुद्दा होता, मात्र मोदींची भेट झाली म्हणून आम्ही शांत झालो, असा गैरसमज राज्यसरकारने करून घेऊ नये, हे आम्ही स्पष्ट सांगतोय. आम्ही उद्विग्न झालो, समाज रस्त्यावर आला की काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न सरकार करते. आजचा प्रकार ही तसलाच आहे.

बैठक संपेपर्यंत भाबडी आशा होती, आम्हाला वाटत होतं काहीतरी होईल, मात्र सरकारने काहीही सांगितलं नाही वा स्पष्ट केलं नाही. त्यामुळं पुन्हा शून्य अशी अवस्था झाली आहे. सरकारने आता त्याच्या हातात जे आहे, ते समाजाला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. असेही पाटील म्हणाले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button