Chimur

राजस्थानात अडकलेल्या विद्यार्थ्याना महाराष्ट्रात आणणार विजय वडेट्टीवार यांची ग्वाही

राजस्थानात अडकलेल्या विद्यार्थ्याना महाराष्ट्रात आणणार विजय वडेट्टीवार यांची ग्वाही

काळजी करू नका विद्यार्थी लवकरच सुरक्षित स्वगृही परततील : मंत्री विजय वडेट्टीवारांचे राजस्थानात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आवाहन

चंद्रपूर प्रतिनिधी–ज्ञानेश्वर जुमनाके

चंद्रपूर, दि. २6: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात टाळेबंदी करण्यात आली. या काळात अचानक वाहतूक व्यवस्था बंद करून तालुका,जिल्हा आणि राज्याच्या सीमा सील केल्याने राजस्थानातील कोटा शहरात शिक्षणासाठी गेलेले महाराष्ट्रातील जवळपास दीड ते दोन हजार विद्यार्थी तिथेच अडकून पडले आहेत त्यांना आणण्यासाठी। महाराष्ट्र व राजस्थान सरकारने परवानगी दिलेली असल्यामुळे येत्या २ ते ३ दिवसात महाराष्ट्रात आणू अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

जगावर कोरोना महामारीचे सावट आल्याने सर्वच देशाने कोविड १९ या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी विमानसेवा बंद केली, त्यापाठोपाठ देशातील राज्य तालुका आणि जिल्हाच्या सीमा सील केल्या गेल्या. देशात २१ दिवसाचा लॉकडाऊन असल्याने १४ एप्रिल नंतर परिस्थिती पूर्ववत होईल अशी अपेक्षा होती. परंतु १४ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केला परिणामी विविध स्पर्धा परीक्षांच्या यु.पी.एस.सी., आय.आय.टी.-जे.ई.ई.,सी.ई.टी. आदी तयारीसाठी राजस्थानातील कोटा शहरात गेलेले महाराष्ट्रातील दीड ते दोन हजार विद्यार्थी तिकडेच अडकले असून त्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्यांच्या पालकांनी व विध्यार्थ्यांनी राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासोबत मोबाईल वर सम्पर्क साधून माहीती दिली. वडेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव अजय मेहता, मुखमंत्राचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांना निवेदन पाठवून सतत पाठपुरावा करून उत्तर प्रदेशच्या धर्तीवर त्यांना महाराष्ट्रात आणण्याची व्यवस्था करावी अशी मागणी सातत्याने केली. आपत्ती व्यवस्थापन या त्यांच्या विभागाने या मागणीचा राजस्थान सरकारकडे सतत पारपुवठा केल्याने अखेर राजस्थान सरकारने त्यांच्या राज्यात अडकल्या विद्यार्थ्याना महाराष्ट्रात आणण्याची परवानगी दिली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात त्यांना महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे.

वडेट्टीवार म्हणाले राज्यातील सर्व जिल्हाअधिकाऱयांशी याबाबत चर्चा सुरु असून जिल्हाधिकाऱयांकडून विद्यार्थ्याची माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे. माहितीचे संकलन झाल्यानंतर येत्या २ ते ३ दिवसात विद्यार्थ्याना महाराष्ट्रात आणन्याचे काम सुरु होईल. यासंदर्भात परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्याशी चर्चा झाली असून या विद्यार्थ्याना महाराष्ट्रात आणण्यासाठी विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत विद्यार्थ्याना महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीत गेलेले व लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात परतू न शकलेल्या विद्यार्थ्याना देखील महाराष्ट्र्रात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. या विद्यार्थ्यांच्या आवश्यक त्या सर्व वैद्यकीय चाचण्या करून आवश्यकता असल्यास त्यांना १४ दिवस विलगवासात ठेवण्यात येईल,आणि त्यांना त्यांच्या घरी सुरक्षित पोहचवण्यात येईल त्यामुळे चिंता करू नका असे आवाहन वडेट्टीवार यांनी परराज्यात अडकलेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button