Paranda

धाराशिव जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी मनिषा जगताप तर परंडा तालुका सचिव पदी सुप्रिया गटकुळ यांची निवड

धाराशिव जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी मनिषा जगताप तर परंडा तालुका सचिव पदी सुप्रिया गटकुळ यांची निवड

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे

परंडा येथे धाराशिव जिजाऊ ब्रिगेडची जिल्हाध्यक्ष शिवमती आशाताई मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

या बैठकीमध्ये शिवमती मनिषा ज्ञानदेव जगताप* यांची जिजाऊ ब्रिगेड, उस्मानाबादच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली तर शिवमती सुप्रिया धर्मराज गटकुळ यांची जिजाऊ ब्रिगेड, परंडा तालुका सचिव पदी वर्णी लागली दोघीनाही निवडीचे पत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती जिजाऊ ब्रिगेड, परंडाच्या विद्यमान तालुका अध्यक्ष शिवमती तेजस्विनी करळे तसेच विद्यमान कार्याध्यक्ष शिवमती बालीका शिंदे विद्यमान तालुका उपाध्यक्ष शिवमती ज्योती पवार, मा. तालुका अध्यक्ष शिवमती अपेक्षा पाटील तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्य कल्पना मोरे-पाटील, सुरेखा सुर्यवंशी, राणी गवळे, पल्लवी पाटील, डाॕ जयश्री गोफणे, सुषमा करळे, विद्या सुर्यवंशी, डाॕ रमा मोरे, डाॕ. कुमूदीनी पाटील, सुप्रीया जगताप, मनिषा ऐतवाडे.
आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button