Pandharpur

आत्मविश्वास जिद्द या जोरावर माणूस कशावरही मात करू शकतो.प्रा.दुपडे जनकल्याण कोवीड सेंटर मध्ये व्याख्यानाचा कार्यक्रम..,

आत्मविश्वास जिद्द या जोरावर माणूस कशावरही मात करू शकतो.प्रा.दुपडे
जनकल्याण कोवीड सेंटर मध्ये व्याख्यानाचा कार्यक्रम..,
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपुर जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर मनामध्ये पॉझिटिव्ह विचार असले पाहिजे आत्मविश्वास जिद्द या जोरावर माणूस कशावरही मात करू शकतो कोरोना आजार हा किरकोळ आहे मनातून भीती काढा मला काहीच होणार नाही असा विचार करा तुम्ही निम्मे नक्की बरे होणार, जनकल्याण पेड कोवीड सेंटर मधील रुग्णांकरिता व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी व्याख्याते प्राध्यापक दुपडे सर बोलत होते. सोलापूर जिल्ह्यात कोरोणा प्रादुर्भाव वाढत आहे उपचाराअभावी रुग्णांची होणारी धावपळ लक्षात घेऊन युवा गर्जनाचे संस्थापक समाधान दादा काळे यांनी कोवीड रुग्णाकरीता 100 बेडचे जनकल्याण पेड कोवीड केअर सेंटर मध्ये रुग्णाची आपुलकीने विचारपूस होतच आहे तसेच समाजातील गरजू रुग्णांना अल्पदरात सुविधा तसेच मनोरंजन कार्यक्रम व्याख्यान कार्यक्रम घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासत मोलाचे कार्य करीत असल्याचे प्राध्यापक दुपडे सर यांनी
सांगितले.नागरिकांनी नियमित मास्क सोशलडिस्टन्सचे पालन केले तर आपण कोरोनावर नक्की मात करू कोणताही आजार असला तरी अंगावर न काढता तात्काळ तपासणी करून त्यावर उपचार करून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे डॉक्टर शिनगारे यांनी सांगितले. यावेळी प्राध्यापक दुपडे सर यांचा सत्कार जनकल्याण हॉस्पिटल डॉक्टर सुधीर शिनगारे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी समाधान दादा काळे डॉक्टर अनिल काळे, डॉक्टर प्रकाश जडल, डॉक्टर श्रेया जाधव, डॉक्टर ऐश्वर्या देठे, नर्सिंग स्टाफ उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button