नांदेड

उप-जिल्हाध्यक्ष पदी महेश शामराव जाधव यांची निवड

उप-जिल्हाध्यक्ष पदी महेश शामराव जाधव यांची निवड
नांदेड राजेश सोनुने
स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड नांदेड जिल्ह्याच्या वतीने दि. 4 रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नांदेड जिल्ह्यातील उर्वरित कार्यकारणी जाहीर करण्यात आली स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या उत्तर वि.आ. उप-जिल्हाध्यक्ष पदी महेश शामराव जाधव यांची निवड प्रदेशध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत मुळे, विभागीय संघटक गणेश काळम, प्रदेश संघटक विलास पाटील इंगळे, जिल्हाध्यक्ष सुनील पा.कदम, हनमंत पा.वाडेकर, मंगेश कदम, सदा पा.पुयड, शशिकांत पाटील, गजू पा.सांगवीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वरील निवड करण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष माधवराव पा.देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक शासकीय विश्रामगृह नांदेड येथे मोठ्या उत्साहात पार पडली असून या बैठकीला नांदेड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व संघटनेचे ध्येयधोरणे समजून सांगितले. जिल्हाध्यक्ष सुनील पा.कदम, हनमंत पा.वाडेकर यांनी सर्व तालुकाध्यक्षांना प्रत्येक तालुक्यामध्ये दुष्काळी संदर्भात निवेदने देऊन शासनाचे लक्ष वेधून घेण्याचे काम करावे, असे सांगितले.

या बैठकीला प्रकाश घोगरे, नवनाथ जोगदंड, शिवाजी जाधव, बालाजी कऱ्हाळे, अमोल वानखेडे, चंद्रकांत वन्नाळे, वैभव भिसीकर, बजरंग जिगळेकर, श्री पा.खराणे, कैलास कदम, शिवा कदम, गंगाराम कदम, शिव पुयड यांच्यासह स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवाजी जाधव यांनी केले, तर आभार मंगेश कदम यांनी मानले.

Leave a Reply

Back to top button