Dondaicha

शहर व परिसरातील महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती साधेपणाने साजरी करावी- कोळी समाजाचेअध्यक्ष मयुर कोळी यांचे आवाहन..

शहर व परिसरातील महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती साधेपणाने साजरी करावी- कोळी समाजाचेअध्यक्ष मयुर कोळी यांचे आवाहन..

करोना आजाराला हलक्यात न घेता,शासनाचे नियम पाळत घरोघरी साधेपणाने प्रतिमा पुजन करा

दोंडाईचा- येथे येणाऱ्या 31 ऑक्टोंबर 2020 रोजी कोळी, कोरी समाजाचे आराध्य दैवत महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या जयंती दिनी समाजातील सर्व स्थरातील लोकांनी सध्या देशात हाहाकार माजवलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जयंती साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन कोळी, कोरी समाजाचे शहर अध्यक्ष मयुर भाऊ कोळी यांनी केले आहे.

दोंडाईचा शहर व परिसरात कोरोनासारख्या भिषण आजाराने मागील तीन ते चार महिन्यात चांगलेच थैमान घालत मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या गावागावात वाढीस आली होती. म्हणून शासन स्थरापासून, सर्वसामान्य व्यक्तींनी खबरदारी घेत आपले व आपले परीवाराच्या जिवीताचे रक्षण केले. तरीही शहर व परिसरात मयत व रुग्णांची संख्या चांगलीच फोफावली होती. म्हणून सरकारने आता माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवत प्रत्येक नागरिकाला आत्मनिर्भर करण्याचे योजिले आहे. तरी सरकारने वेळोवेळी जे नियम घालून दिले आहे. त्याचे आपण तंतोतंत पालन केले पाहिजे. म्हणून पहिलेच आपला कोळी ,कोरी समाज अशिक्षित, अज्ञानी, वैद्यकीय शिक्षणापासून कोसोदूर, गरिबीत जिवन जगत आहे. म्हणून कोणीही कोरोना सारख्या गंभीर आजाराला हलक्यात घेऊ नये. म्हणून येणाऱ्या 31 ऑक्टोंबर 2020 रोजी समाजाचे आराध्य दैवत महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमा पुजन, प्रत्येकाने आपल्या यथाशक्ती प्रमाणे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जातांना तोंडाला माक्स, सोशल डिस्टसिंग ठेवत शासनाचे नियमाचे पालन करत प्रतिमा पुजन करायचे किंवा वाटल्यास आणखी खबरदारी म्हणून प्रत्येकाने घरोघरी जरी कुटुंबासह प्रतिमा पुजन केले तरी जयंतीचे उदिष्ट सार्थ होणार आहे असे आवाहन कोळी ,कोरी समाजाचे दोंडाईचा शहर अध्यक्ष मयुर कोळी यांनी केले आहे…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button