Latur

कोकळगाव मध्ये महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती साजरी..

कोकळगाव मध्ये महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती साजरी..

लातूर : शनिवार दि.31ऑक्टोबर रोजी निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथे महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र विठुबोने, कोळी समाजाचे अध्यक्ष दत्तात्रय विठुबोने, जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक संदीप तिप्पनबोने,अनिल कामले,सह शिक्षक गौतम कांबळे,कोकळगाव भीमसेना लक्ष्मण सुरवसे शालेय अध्यक्ष सुरेश लामतुरे,जि.प.शालेय अध्यक्ष माधव लामतुरे ,संतोष वांजरवाडे,हरिभाऊ विठुबोने, रेवन बेदरे, दयानंद विठुबोने, विवेकानंद विठुबोने,दिलीप पाटील व 0परिसरातील कोळी बांधव आदींची उपस्थिती होती.प्रथमतः महर्षी वाल्मिक ऋषींच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे राजेंद्र विठुबोने व अनिल कामले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी रामायण रचनाकार वाल्मिक ऋषी यांच्या चरित्राचे वाचन करण्यात आले.जि.प.प्रा.शाळेत ही इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी ब महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी अनेक मान्यवरांची आवर्जून उपस्थिती होती.कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेचे मुख्याध्यापक संदीप तिप्पनबोने यांनी केले.आभार प्रदर्शन दत्ता विठुबोने यांनी केले .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button