Khirdi

महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम..! वृक्षरोपण व फळवाटप करून साजरा.

महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम..! वृक्षरोपण व फळवाटप करून साजरा.

प्रविण शेलोडे खिर्डी

खिर्डी : रावेर तालुक्यातील विटवे येथे महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष आद.मुकुंद भाऊ सपकाळे यांच्या 59 व्या वाढदिवसानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर जवळील नवीन प्लॉट या ठिकाणी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे युवा जिल्हा अध्यक्ष तथा रावेर तालूका अध्यक्ष साहेबराव वानखेडे यांनी वृक्षारोपण केले व ऐनपुर येथील प्रा.आ.केंद्र या ठिकाणी डॉ.संदीप चवरे यांच्या उपस्थित दवाखान्यात उपचार घेत असलेल्या पेशंट ला फळ वाटप केले.महाराष्ट्र मध्ये ओढवलेल्या पूर परिस्थिती मुळे भाऊंचा वाढदिवस साध्या व सोप्या पद्धतीने साजरा करण्यात आला या कार्यक्रमा वेळी तालुका अध्यक्ष साहेबराव वानखेडे डॉ. व्ही डी महाजन,डॉ.संदीप चवरे डॉ.सोहेल अहमद काझी,राष्ट्रवादी युवक तालुका सरचिटणीस अरविंद महाजन, नितीन जैतकर, राजू वानखेडे, जितू इंगळे,मकुंदा गणेश,भुरा पाटील,गजानन कोळी, सीताराम वानखेडे,श्रीराम कोळी,जितेंद्र सावळे, एस के पाटील,शेख सईद शेख शब्बीर,नरेंद्र वानखेडे,गौरव कोळी, अजय कोळी आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button