Bhandra

?महाराष्ट्र हादरला ! भंडाऱ्यात नवजात शिशु केअर युनिटला आग..!10 बालके दगावली..चौकशी समिती स्थापन.3 दिवसात अहवाल करणार सादर..

?महाराष्ट्र हादरला ! भंडाऱ्यात नवजात शिशु केअर युनिटला आग ; 10 बालके दगावली चौकशी समिती स्थापन.3 दिवसात अहवाल करणार सादर..

भंडारा : जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनीटमध्ये ( SNCU ) शॉर्ट सर्किटने आग लागल्याने दहा बालकांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास ही आग लागली होती. धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

रात्रीच्या वेळी अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बाॅर्न युनिट मधून धूर निघत असल्याचे समोर आले. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितला असता त्या रूम मध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता. त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. या शिशु केअर युनीटमधील सात बालकांना वाचविण्यात आले आहे.

दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या SNIC मध्ये आउटबॉर्न आणि इन बाॅर्न अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटर मध्ये असलेले सात बालक वाचविण्यात आले. तर आऊट बाॅर्न युनिटमधील 10 मुलांचा मृत्यू झाला.

?महाराष्ट्र हादरला ! भंडाऱ्यात नवजात शिशु केअर युनिटला आग..!10 बालके दगावली..चौकशी समिती स्थापन.3 दिवसात अहवाल करणार सादर..

रुग्णालयात जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. प्रमोद खंडाते दाखल. रुग्णालयाला पोलिसांचा वेढा असून आरोग्य उपसंचालक संजय जयस्वाल नागपूर येथून भंडारा रुग्णालयात पहाटे ५.३५ वाजता दाखल झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सुरु आहे.

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जळीत प्रकरणातील बालकांच्या मृत्यूच्या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून ही समिती शासनाला तीन दिवसात अहवाल सादर करेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. बेजबाबदार आणि दोषी असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

भंडारा जिल्हा रुग्णालयाला आज दुपारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यावेळी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयातील घटनास्थळाची पाहणी करताना त्यांनी आगीचे नेमके कारण, रुग्णालयाचे फायर एक्स्टींग्विश आणि इतरही सुरक्षात्मक बाबींचे ऑडिट अशा सर्व बाबींची ही समिती चौकशी करेल. या समितीत संबंधित विषयांचे तज्ञ समाविष्ट करण्यात आले आहेत, असे टोपे यांनी सांगितले.

स्ट्रक्चरल, फायर आणि एक्स्टींग्विश ऑडिट आणि रुग्णालयात नेमका स्फोट होण्याची कारणांबाबतही ही समिती शासनाला अहवाल सादर करेल, कसे सांगतानाच भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी ही समिती गठित केली असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.

पोलिसही करणार चौकशीः रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेशी सर्व संबंधितांची तसेच प्रत्यक्षदर्शींचीही समितीसोबतच पोलिसांकडूनही चौकशी केली जाणार आहे. बेफिकीरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही टोपे यांनी दिला.

Leave a Reply

Back to top button