Jalgaon

सेवक सेवाभावी संस्था कडून कोरोना योद्धांचा महाराष्ट्र गौरव पूरस्कार देऊन सन्मान.

सेवक सेवाभावी संस्था कडून कोरोना योद्धांचा महाराष्ट्र गौरव पूरस्कार देऊन सन्मान.

जळगाव : सेवक सेवाभावी संस्था कडून कोरोना महामारी च्या काळात ज्या समाज सेवक- सेविका यांनी सामाजिक दायित्व समजुन समाजोपयोगी कार्य केले अश्या सर्व कोरोना योद्धांचा सेवक सेवाभावी संस्था कडून
सेवक सेवाभावी संस्था च्या कार्यालयात गोलाणी मार्केट जळगाव येथे महाराष्ट्र गौरव पूरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी व्यासपीठावर श्री दिलीपजी चोपडा जळगाव तर प्रमुख अतिथी म्हणून समाज सेविका डॉ,निलीमा सेठिया जळगाव,मंदा पडवेकर चंन्द्रपूर,समाज सेवक दिपकजी जोशी, संघपाल तायड़े,जळगाव,कैलासजी शर्मा मालेगांव,सेवक सेवाभावी संस्था चे संस्थापक विशाल शर्मा ई मान्यवर मंचवर उपस्थित होते.
कार्यकमा च्या शुरुवाती ला श्री गणेश वंदना ,शुभंमकरोती कल्याणम च्या ध्वनीत मान्यवरांच्यां हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आपले मनोगत व्यक्त करतांना दिलीपजी चोपडा म्हणाले कि सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा हे आपल्या अंतरात्मा मधुन मिळते त्या साठी ईश्वरी कृपा आवशक्य आहे,कोरोना महामारी च्या काळात वैद्यकीय कर्मचारी,पोलीस कर्मचारी,आरोग्य कर्मचारी यांनी व तसेच सामाजिक कार्य करणार्या समाज सेवक -सेविका यांनी जो कोरोना विरोधात लढा दिला तो आपण सर्वांसाठी प्रशंसनीय आहे,आपण सर्वांच्या कार्याची दखल घेत सेवक सेवाभावी संस्था कडून सर्वांना कोरोना योद्धा म्हणून महाराष्ट्र गौरव पूरस्कारांने सन्मानित करण्यात येत आहे ते प्रेरणादायी प्रंशसनीय कार्य आहे.
पुढे व्यासपीठ वरून आपले मनोगत व्यक्त करतांना कैलासजी शर्मा म्हणाले कि कोरोना महामारी च्या शुरुवाती ला मालेगांव चे नाव खुप आघाडीवर होते पण समाज सेवकांनी,प्रशासनानी जागरुकता करून कोरोना आजारावर नियंत्रण मिळवले ते फक्त समाज सेवकांनी केलेल्या कार्या मुळे त्या साठी त्यांनी घेतलेले परीश्रम अभिनंदनास पात्र आहे.
त्या नंतर दिपकजी जोशी यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले कि या अतिकठिण काळात सर्वांनी जे धैर्य व एकजुटता दाखवली ते कौतुकास्पद आहे, कोरोना महामारीत प्रत्येक नागरिकांने आपले सामाजिक दायित्व समजुन कार्य केले व विविधते मधे एकते चे दर्शन घडविले ते कौतुकास्पद आहे.
आपल्या प्रस्तावना मधे आपले मत मांडताना संस्थाध्यक्ष विशाल शर्मा म्हणाले कोरोना महामारीच्या काळात भारतातील सर्व जनता एकामेकास साह्य करण्यासाठीं तत्परतेंने कार्य करत होती व याच जनते मधून नवोदित समाज सेवक उदयास आले व त्यांचे कार्य निरंतर चालत राहों व त्यांना प्रेरणा मिळत रहावी कारण पुरस्कार प्रेरणा देतात व प्रेरणेंने राष्ट्र मोठे होण्यास मदद मिळते या उद्दैशांने महाराष्ट्र गौरव पूरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन सोनल कपोते,जिनल जैन यांनी संयुक्त पणे केले तर आभार प्रदर्शन विशाल शर्मा यांनी केले.
कार्यक्रमच्या यशस्वेते साठी श्रैया शर्मा,कनिष्क शर्मा,सुनिता कसबे ,अश्विनी जाधव यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button