मोठा वाघोदा

महाराष्ट्र मराठी 7 न्यूज च्या दणक्याने शिक्षण विभाग खदबडून झाले जागे…मोठा वाघोदा येथील लहान विद्यार्थी प्रकरणात शिक्षण विभाग झाले सक्रिय

महाराष्ट्र मराठी 7 न्यूज च्या दणक्याने शिक्षण विभाग खदबडून झाले जागे…मोठा वाघोदा येथील लहान विद्यार्थी प्रकरणात शिक्षण विभाग झाले सक्रिय

मोठा वाघोदा प्रकाश विद्यालय विद्यार्थी मारहाण प्रकरणी सायंकाळी शाळा सुटली असल्याच्या वेळेवर गेल्याने चौकशी न करताच परत गेले असल्याचा शिक्षण विभागाचे अधिकारी यांचा तक्रारदार यांना भ्रमण ध्वनीवरून खुलासा
प्रतिनिधी मोठा वाघोदा बु ता.रावेर
*सदरील प्रकाश विद्यालय मोठे वाघोदे विद्यार्थी मारहाण प्रकरणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या उपशिक्षणाधिकारी के डी चव्हाण मॅडम यांनी तक्रारदार यांना मी सदर विद्यार्थी मारहाण प्रकरणाची चौकशी करण्यास प्रकाश विद्यालयात आलेले असताना शाळेची सुट्टी झाली असल्यामुळे चौकशी न करताच परतली असल्याचा खुलासा तक्रारदार यांना भ्रमणध्वनी द्वारे दिला तसेच दोन-तीन दिवसात शाळेत पुन्हा चौकशी करण्यास येणार असून सदरील विद्यार्थी व आपल्या समक्ष चौकशी करणार असल्याचेही त्यांनी भ्रमणध्वनीवरून तक्रारदार मुबारक (राजू) अलीखा तडवी यांना सांगितले याच प्रकरणी मुक्ताईनगर डीवायएसपी यांना तक्रारदार यांनी दिलेल्या लेखी तक्रार अर्जावर कार्यवाही करण्याचे सावदा पोलिस स्टेशन ला दिले लेखी पत्राद्वारे आदेश*
महाराष्ट्र मराठी 7 न्यूज चा दणका
प्रतिनिधी मोठा वाघोदा.ता.रावेर
मोठा वाघोदा येथील प्रकाश विद्यालय व ज्युनिअर कॉलेज इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असलेल्या मोहशीन मुबारक तडवी या विद्यार्थ्यास केलेल्या मारहाण प्रकरणी मोहसीन तडवी यांचे वडील मुबारक तडवी यांनी मुक्ताईनगर पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कार्यवाही व्हावी या हेतूने लेखी निवेदन दिले होते त्याच अनुषंगाने माननीय उपविभागीय पोलीस उपविभगिय अधिकारी मुक्ताईनगर यांनी सावदा पोलीस स्टेशनला योग्य ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबंधित वरिष्ठ कार्यालयास पाठवावा असे सावदा पोलिस स्टेशनला त्यांनी दिलेल्या लेखी पत्राद्वारे नमूद केले आहे
मोठा वाघोदा येथिल विद्यार्थी बेदम अमानुष मारहाण प्रकरणातील दोषींची शिक्षण विभागाने जिल्हा परिषद जळगाव यांनी परस्पर चौकशी करून तक्रारदार यांना समक्ष न बोलवता केली असल्याने
तक्रारदार पालकाने उपोषणाचा इशारा दिला आहे
मोठा वाघोदा बु ता रावेर येथील प्रकाश विद्यालयातील विद्यार्थ्यांस सर्दी पडशाने बाधित मोहसीन मुबारक तडवी इ यत्ता9 वी चे वर्गातील विद्यार्थ्याला खोकलत व शिंकत असताना दिंनाक 21/9 रोजी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक या दोन्ही शिक्षकांनी विद्यार्थ्यांला बुधिद्वेशने बेदम अमानुष मारहाण केली होती सदरील पीडित मुलाची रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात शरीरावरील व्रण व जखमांची वैदयकीय तपासणी करण्यात आली होती सदरील मारहाण ग्रस्त असलेल्या त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या बेदम अमानुष मारहाण प्रकरनी सावदा पोलिस स्टेशन म उपविभागीय पोलीस अधीक्षक मुक्ताईनगर , मा ,गटशिक्षणाधिकारी रावेर प स , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, माध्यमिक शिक्षणाधिकारी जळगांव यांचे कडे लेखी निवेनाद्वारे तक्रार केली होती मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली नसून संबंधित शिक्षण विभागाच्या वतीने मारहाण प्रकरनातील विद्यार्थी व तक्रारदार पालक यांना डावलून व समक्ष न बोलवता परस्पर चौकशी केली असल्याचे वृत्त महाराष्ट्र मराठी 7 न्युज ला प्रकाशित होताचजळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमिक उपशिक्षणाधिकारी के डी. चव्हाण मॅडम तक्रारदार यांना भ्रमणध्वनीवरून मी प्रकाश विद्यालयात चौकशी करण्यास आले असता शाळेची सुट्टी झाल्यामुळे विद्यार्थी उपस्थित नसल्यामुळे चौकशी न करताच परतले असून मी पुन्हा प्रकाश विद्यालयाचे चौकशीकामी दोन तीन दिवसात येणार असून विद्यार्थी व आपण तक्रारदार आपल्या समक्ष चौकशी करणार असल्याचे त्यांनी यावेळी भ्रमणध्वनीवरून तक्रारदार यांना सांगितले मात्र तक्रारदार यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी शिक्षकांवर कायदेशीर गुन्हा दाखल करून कायदेशीर कार्यवाही होऊन न्याय न मिळाल्यास तक्रारदार पालक मुबारक उर्फ राजु, अलीखा, तडवी जि प, मुख्य कार्यकारी अधिकारी/पोलिस अधीक्षक जळगांव,/ प्रांताधिकारी फैजपूर /तहसीलदार/पंचायत समिती रावेर यांचे कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले तसेच पोलिस उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या कार्यवाही करण्याची लेखी पत्र वर सावदा पोलीस स्टेशन चे अधिकारी काय? कारवाई करतात? व जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग चौकशी करून काय कार्यवाही करते? याकडे विद्यार्थ्यांसह पालकाचे लक्ष लागून आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button